Pune : सराफाकडे काम करणार्‍याने केला 36 लाखांचा अपहार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ज्वेलर्समध्ये काम करणार्‍या कारागिराने 36 लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्याचा अपहार केला असून, दागिने पॉलिश करण्यासाठी दिल्यानंतर तो दागिने घेऊन पसार झाला आहे.

याप्रकरणी मैदुल शेख (वय 31, चापडना, हुगळी, पश्चिम बंगाल) असे दागिने घेऊन पसार झालेल्या कारागिराचे नाव आहे. याबाबत मनोज इंद्रजीत मन्ना (वय 36, रा. कसबा पेठ, पुणे) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मनोज मन्ना यांचे बुधवार पेठेत मनोज गोल्डस्मिथ नावाचे सराफ दुकान आहे. तर आरोपी मैदुल शेख हा त्यांच्या दुकानात काम करत होता. तो गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या दुकानात काम करत होता. त्यामुळे फिर्यादी यांचा त्याच्यावर विश्वास बसला होता. तर त्याने देखील त्यांचा विश्वास संपादन केला होता. फिर्यादी व इतर 4 ज्वेलर्सचे दागिने त्याच्याकडे पॉलिश करण्यासाठी दिले होते. त्यावेळी तो 35 लाख 80 हजार रुपयांचे 750 ग्रॅम सोन्याचे दागिने घेऊन पसार झाला आहे. हा प्रकार उघड होताच फिर्यादी यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली आहे. अधिक तपास फरासखाना पोलिस करत आहेत.