Pune : भारती विद्यापीठ परिसरात घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   भारती विद्यापीठ परिसरात घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्याच्याकडून 3 घरफोडी व 2 जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणत सव्वा सहा लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

रोहित नानाभाऊ लंके (वय 21, रा. विश्रांतवाडी) असे अटक केलेल्या सराईताचे नाव आहे.

लंके हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर आतापर्यंत ११२ घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. आंबेगाव बुद्रुक येथील डॉ. वैभव लटके यांचे बंद क्लिनिक फोडून ७० हजारांचा ऐवज चोरून नेला होता. या गुन्ह्याच्या अनुषंगाने भारती विद्यापीठ पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत होते. यावेळी ही घरफोडी लंके याने केली असल्याचे आढळून आले. तो सध्या बिबवेवाडी येथील घरफोडीच्या गुन्ह्यात कारागृहत असल्याचे समजले. त्यानुसार त्याला पोलिस उपनिरीक्षक महेंद्र पाटील व कर्मचारी हर्षल शिंदे, श्रीधर पाटील, राजू वेगरे, शंकर कुंभार यांच्या पथकाने या गुन्ह्यात वर्ग करून घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली. त्यावेळी सहा ते सात महिन्यांपूर्वी अल्पवयीन साथीदारांसोबत घरफोडी व जबरी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून 3 घरफोड्या व 2 जबरी चोरीच्या गुन्हे उघडकीस आणत 100 ग्रॅम सोने रोख रक्कम असा सव्वा सहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

You might also like