पुणे : पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त करणारा संगणक अभियंता अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या संगणक अभियंत्याला पोलिसांनी अटक केली. अटक केलेल्या अभियंत्याच्या पत्नीने हडपसर येथील कॉसमॉस अपार्टमेंटच्या ११ व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली होती. ही घटना शनिवार (दि.७) घडली होती.

मिनाक्षी गिरीश पांडे (वय-४६ रा. कॉसमॉस अपर्टमेंट, ११ वा मजला, एफ विंग, मगरपट्टा सिटी, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या विवाहीतेचे नाव आहे. याप्रकरणी तीचा पती गिरीश सुरजप्रसाद पांडे (वय-४७) याला अटक करण्यात आली आहे. मिनाक्षची बहिण मृत्युंजय पाठक (वय-५६ रा. मंडल, मध्यप्रदेश) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
[amazon_link asins=’B074L18D3W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’586fb0d7-8443-11e8-9876-b11c00d71ae9′]

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिनाक्षी आणि गिरीश यांचे मे २०१८ मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर सासरी नांदत असताना पती गिरीश याने मिनाक्षी यांचा छळ करण्यास सुरुवात केली. तीला टोचून बोलून शारिरीक आणि मानसिक छळ केला. पतीच्या छळाला वैतागून मिनाक्षी यांनी शनिवारी इमारतीच्या ११ व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. पत्नीचा शारिरीक आणि मानसीक त्रास देऊन तीला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गिरीश पांडे याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.

You might also like