Pune : सोसायटीसमोर उभी केलेली रिक्षा बाजूला घेण्यास सांगितल्याने टोळक्याने केला दाम्पत्यावर हल्ला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सोसायटीसमोर उभी केलेली रिक्षा बाजूला घेण्यास सांगितल्याने टोळक्याने दाम्पत्यावर हल्ला केल्याची घटना घडली. गोखलेनगर भागात हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी रत्ना रानडे (वय ३४, रा. जनवाडी) यांनी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सहा ते आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी रात्री सव्वासातच्या सुमारास रत्ना पतीसह सहकारनगरला चालले होते. त्यावेळी त्यांच्या सोसायटीसमोर रिक्षा उभी करण्यात आली होती. त्यामुळे रत्ना यांनी त्या रिक्षाचालकाला रिक्षा बाजूला घेण्यास सांगितले. तसेच फोटो काढण्याचा प्रयत्न केला. त्याचा राग आल्यामुळे टोळक्याने रत्ना यांच्या हातातील आयपॅड फोडून त्यांना व पतीला मारहाण केली. अधिक तपास चतुःशृंगी पोलीस करीत आहेत.