पुणे : मुलीकडून डॉक्टर पित्याला मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

कौटुंबीक वादातून मुलीकडून डॉक्टर पित्याला मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुलीविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार कोंढवा येथील एनआयबीएम रोडवरील फेज २ मध्ये रविवारी (दि.१२) दुपारी दीड ते सायंकाळी पावणेसहाच्या दरम्यान घडला. २७ वर्षीय मुलीवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
[amazon_link asins=’B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f6d1e66a-a2ed-11e8-8bb6-2f9d0e0bd72f’]
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदअली कुरेशी हे डॉक्टर असून काही वर्षे ते सौदी अरब, दुबई येथे डॉक्टरी व्यवसाय करीत होते. त्यांची दोन लग्न झाली असून ते चार महिन्यांपूर्वी कोंढवा येथे राहण्यास आले आहेत. त्यांना पहिल्या पत्नीपासून एक मुलगा आणि दोन मुली आहेत. कोंढवा येथे राहण्यास आल्यानंतर त्यांच्यात आणि पत्नीमध्ये वाद झाले. त्यामुळे पत्नी मुलाला घेऊन कॅनडा येथे निघून गेली. तर दोन मुली कोंढवा येथे राहतात.

डॉक्टर अहमदअली आणि त्यांच्या दोन मुलींमध्ये वाद आहेत. रविवारी (दि.१२) दुपारी दीडच्या सुमारास डॉक्टर कुरेशी हे नमाज पठण करुन घरी आले असता हिबा घरामध्ये होती. त्यांनी घराचा दरावाजा वाजवला परंतु हिबाने आतून कोणताही प्रतिसाद दिला नाही. अखेर कुरेशी यांनी नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली. कोंढवा पोलिसांनी घटनस्थळी येऊन मुलीला दार उघडण्यास सांगितले परंतु तिने दार उघडण्यास नकार दिला. पोलिसांनी महिला पोलिसांना बोलवून दार उघडले असता मुलगी हिबा हीने रागात येऊन वडीलांचा चेष्मा तोडून त्यांना हाताने मारहाण केली. कुरेशी यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात येऊन मुलीविरुद्ध फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी हिबा कुरेशी हिचेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like