Pune : कोरोना नियमाचे उल्लंघन करणार्‍या भवानी पेठेतील ‘या’ हॉटेलला 1 लाख रूपयाचा दंड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भवानी पेठेतील मिलन व्हेज हॉटेलवर धाड टाकून 1 लाखांचा दंड वसूल केला आहे. पुणे महापालिकेच्या भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाने शनिवारी (दि.22) ही कारवाई केली आहे.

हॉटेलमध्ये ग्राहकांना टेबलवर बसून जेवण करू दिल्याने भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त सोमनाथ बनकर व वरिष्ठ आरोग्य निरीक्षक मुख्तार सय्यद यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. यावेळी आरोग्य निरीक्षक संतोष कदम, संजय साळुंके, निसार मुजावर, मोहन चांडले आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान बनकर यांनी भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाचा पदभार 2 न दिवसापूर्वीच स्वीकारला आहे. त्यांची ही पहिलीच कारवाई आहे. सर्वांच्या दृष्टीने आरोग्य महत्वाचे आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी पालिकेने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करावे असे आवाहन बनकर यांनी केले आहे. खरे तर आम्ही फक्त पार्सल सेवा सुरू ठेवली आहे. परंतु काल बाहेरच्या शहरातील काही नागरिक जेवणासाठी आले होते. त्यांनी खूप विनंती केली. त्यामुळे आम्ही माणुसकी म्हणून बसून जेवायला दिल्याचे हॉटेल मालक मोहम्मद रईस अब्दुल्ला यांनी सांगितले आहे.