Pune : कडक संचारबंदीमध्ये कात्रज परिसरात महिलेच्या गळयातील सोनसाखळी हिसकावली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात कडक संचारबंदी असताना कात्रज परिसरात एका पादचारी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली.

याप्रकरणी 44 वर्षीय महिलेने भारती विद्याापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दुचाकीवरील दोन अनोळखी चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या सुखसागर परिसरात राहतात. त्या दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास येथून पायी चालत घरी जात होत्या. यावेळी त्या गांधी बंगल्यासमोर आल्यानंतर पाठीमागून भरधाव दुचाकीवर आलेल्या सोन साखळी चोरट्यांनी त्यांच्याजवळ येत गळ्यातील 20 हजारांची सोनसाखळी हिसकावून नेली. त्यांनी आरडाओरडा केला. पण, तोपर्यंत चोरटे पसार झाले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान मचाले हे करत आहेत.