Pune : कुमठेकर रस्त्यावर असलेल्या शिक्षण खात्याच्या इमारतीला भीषण आग (व्हिडिओ )

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कुमठेकर रस्त्यावर असलेल्या शिक्षण खात्याच्या इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आगीत शिक्षण खात्याचे स्क्रॅप मटेरियल जळून खाक झोले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली आहे.

कुमठेकर रस्त्यावर सदाशिव पेठेत राज्य शासनाच्या शिक्षण खात्याचे (एससीइआरटी) येथे जुने कार्यलय आहे. याठिकाणी लाकडी स्क्रॅप मटेरियल ठेवण्यात आले आहे. आज दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास अचानक याठिकाणी आग लागली. नागरिकांनी तात्काळ ही माहिती अग्निशमन दलाला दिली. तोपर्यंत आगीने मोठे स्वरप धारण केले होते. यानंतर कसबा व एरंडवना अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा माराकरून ही आग आटोक्यात आणली. पण यात लाकडी साहित्य जळून खाक झाले आहे. आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा अंदाज अग्निशमन दलाने वर्तवला आहे.