पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – धायरीमधील अभिनव कॉलेज रस्त्यावर असलेल्या एका मोठ्या कंपनीला भीषण आग लागल्याची घटना आज दुपारी घडली. यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून दीड ते दोन तासात आग आटोक्यात आणली. आगीचे कारण समजू शकले नाही.
धायरी येथे अभिनव कॉलेज रस्त्यावर एकाच शेडमध्ये चार कंपन्यांचे छोटे कारखाने आहेत. याठिकाणी गादी तयार करण्यास लागणारे फोम, रबर तसेच कागदी पुठ्ठे, वाढदिवसाचे साहित्य असे साहित्य होते. एकच शेड असले तरी त्यात चार भाग करून त्याठिकाणी हे साहित्य ठवले होते.
दरम्यान आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास अचानक येथून धूर येत असल्याचे दिसून आले. त्यानी तात्काळ अग्निशमन दलाला माहिती दिली. पाषाण व इतर फायर स्टेशन जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. पण तोपर्यंत आग मोठ्या प्रमाणात भडकली होती. कागद व गाडीचे साहित्य असल्याने मोठ्या प्रमाणात धूर देखील झाला होता. परिसरातील नागरिकांना या धुराचा प्रचंड त्रास होत होता. त्यात उन्ह आणि आगीच्या ज्वाला यामुळे नागरिकाना चटके बसत होते. अश्या परिस्थितीतही अग्निशमन दलाच्या जवानांनी या आगीवर पाण्याचा मारा करून दोन तासांनी आग आटोक्यात आणली. त्यानंतर कुलिंगचे काम करण्यात आले. या आगीत मात्र या गोडाऊनचे साहित्य जळून खाक झाले आहे. आग नेमकी कशी लागली हे समजू शकलेले नाही. लाखो रुपयांचे नुकसान मात्र झाले आहे.