पुणे : भरदिवसा डांगे चौकात तरूणीवर चाकुने वार

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – रुग्णालयात कामाला असणाऱ्या तरुणीवर वर्दळीच्या आणि नेहमीच गर्दी असणाऱ्या थेरगाव येथील डांगे चौकात भरदिवसा चाकूने वार करुन जखमी केले आहे. ही घटना बुधवारी (दि. २६) सकाळी दहाच्या सुमारास घडली. हल्ल्याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

गौरी विठ्ठल माळी (२० ,रा. डांगे चौक) असे जखमी तरुणीचे नाव आहे. तर विकास शांताराम शेटे (२१,रा. वाडा, खेड) याला ताब्यात घेतले आहे.

वाकड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गौरी ही डांगे चौकात राहत असून जवळच असणाऱ्या स्पंदन रुग्णालयात नोकरी करते. नेहमी प्रमाणे आज सकाळी ती कामावर जात असताना विकासने पाठीमागून येऊन तिच्यावर चाकूने वार केले. यात ती गंभीर जखमी झाली असून उपचारासाठी तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी विकासला ताब्यात घेतले आहे. तपास वाकड पोलिस करत आहेत.

आरोग्य विषयक वृत्त

‘हे’ खाद्यपदार्थ सेवन केले तर कर्करोगापासून होईल संरक्षण

फुप्फुसांचा संसर्ग ठरू शकतो घातक, वेळीच ओळखा लक्षणे

WHO ने सांगितलं एंटिबायोटिकचा वापर कसा करायचा

या ट्रिक्स फॉलो केल्यास ऑफिसमध्ये तुम्हाला कधीच बोअर होणार नाही

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like