Pune : घरातून विदेशी सिगारेटची विक्री करणार्‍याला अटक, 7 लाख 65 हजाराचा माल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  घरातून विदेशी सिगारेटची विक्री करणाऱ्यास खंडणी व अमंली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून ७ लाख ६५ हजारांची सिगारेट जप्त करण्यात आल्या आहेत.
बनाराम गोेमाजी चौधरी (वय ३५, रा. वडगाव शेरी ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव शेरीतील मुक्ताई घुले कॉम्प्लेक्समध्ये एकजण विदेशी सिगारेटची विक्री करीत असल्याची माहिती खंडणी व अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने त्याठिकाणी छापा टाकला असता, बनाराम विदेशी सिगारेटची विक्री करीत असल्याचे दिसून आले. त्याच्याकडून ७ लाख ६५ हजारांची सिगारेट जप्त करण्यात आली.

पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, सहायक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते, पांडुरंग वांजळे, प्रमोद टिळेकर, सैय्यदसाहिल शेख, प्रदीप गाडे, मोहन येलपले यांच्या पथकाने ही कारवाई केली.