Pune : धनकवडी परिसरात 10 ते 12 जणांच्या टोळक्याकडून तुफान राडा अन् दगडफेक, नागरिकांची धावपळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – धनकवडी परिसरात दहा ते बारा जनांच्या टोळक्याने तुफान राडा घालत अंधाधुंद दगडफेक केल्याची घटना घडली आहे. अचानक घडलेल्या या घटनेने परिसरातील नागरिकांची धावपळ तर उडालीच होती मात्र दहशतीने दुकाने अन घरे बंद करून रहिवाशी जीव मुठीत घेऊन बसले होते. किरकोळ कारणावरून हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी पार्थ कदम (वय 20, रा. साईदत्तनगर) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार 10 ते 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे धनकवडी येथील साई दत्तनगर परिसरातून दुचाकीवरुन घरी जात होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा एक मित्र होता. याठिकाणी फिर्यादी आले असता त्यांना त्यांच्या ओळळीतील एकजण 10 ते 12 जणांना घेऊन थांबला असल्याचे दिसून आले. त्यांनी फिर्यादी यांना अडविले, तसेच तू माझ्या घराची काच का फोडली असा जाब विचारला. त्याने आपण काच फोडली नसल्याचे सांगितले. तर त्याचा राग आल्याने त्याला मारहाण केली. त्याला बेदम मारहाण केली. त्यांच्यावर वार करत तुफान गोंधळ माजवला. रस्त्यावर पडलेला दगड विटा नागरिकांच्या दुका ने बंद केली होती. अचानक झालेल्या या प्रकारामुळे मात्र परिसरात दहशत निर्माण झाली होती. अधिक तपास पोलीस करत आहेत.