Pune : भवानी पेठेमध्ये रस्त्याच्या बाजूलाच मुस्लीम बांधवाने केले नमाज पठण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – रमझान पवित्र महिन्यामध्ये मुस्लीम बांधव नमाज पठण करतात. पठण करण्यासाठी मस्जिद वा घर असले पाहिजे असे नाही, तर त्यासाठी मनातून तीव्र इच्छा असावी लागते. त्याची प्रचिती भवानी पेठ येथे आली. मक्का मदिनाच्या दिशेला तोंड करून सायंकाळी सातच्या सुमारास एका मुस्लीम बांधवाने चक्क रस्त्याच्या बाजूला पायातील चप्पल काढून नमाज पठण सुरू केले. रस्त्याने ये-जा करणाऱ्यांना ही बाब पाहून चटका लावून गेली.

रमजान पवित्र महिन्यामध्ये दिवसभरात पाचवेळा नमाज पठण केले जाते. रमाजानच्या कालावधीमध्ये किमान एकवेळा नमाज पठण केले, तर 70 पट पुण्य मिळते अशी अख्यायिका आहे. त्यामुळे रमजान महिन्यामध्ये जास्तीत जास्त लोक नमाज पठण करतात. मक्का मदिनच्या दिशेला तोंड करून नमाज पठण पढण्याची आणि मदत करण्याची पद्धती रूढ आहे. बारा महिन्यातील रमजान महिना पवित्र मानला जातो, असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या हडपसर विधानसभा महिला अध्यक्षा मिनाझ मेमन यांनी सांगितले.
मेमन म्हणाल्या की, दरवर्षी रमजान ईदला सगळीकडे उत्साही माहोल असतो.

नवीन कपड्यांची खरेदी, सामूदायिक नमाज पठण, शिरखुर्म्याचे वाटप अशी लगबग असते. यंदा मात्र करोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर रमजान ईद साधेपणाने साजरा होत आहे. सुरक्षित वावर ठेवत कुटुंबातच सण साजरा करण्यात येणार आहे. यावर्षी सामूहिक नमाज पठण होणार नाही. मुस्लिम धर्मियांनी आपआपल्या घरात ईदची नमाज पठण केले जात आहे. परिसरातील मौलाना यांना विचारून नमाज पठण करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या ईदवर करोनाच्या संकटाचे सावट आहे.

दरवर्षी नवीन कपड्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात होते. यंदा मात्र अनेकांनी नवीन कपडे खरेदी न करता सामान्य कुटुंबांला मदत केली. ईद दिवशी मुस्लिम धर्मिय अन्य नागरिकांना शिरखुर्माचे वाटप करतात. अनेकांना ईदची दावत दिली जाते. यावर्षी मात्र करोनामुळे शिरखुर्मा वाटप, ईदची दावत रद्द केली आहे, असे त्यांनी सांगितले.