पुणे : रायरेश्वरावर पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मराठा समाजाचा नवीन पक्ष स्थापन होणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

आतापर्यंत बऱ्याचदा मोर्चे आणि आंदोलने काढून देखील मराठा समाजाच्या प्रश्न अनुत्तरित राहिला आहे. राज्यात ४० टक्के मराठा समाज आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे राज्य असताना देखील मराठा समाजाला काही मिळाले नाही म्हणूनच मराठा समाजाची राज्यातील संख्या पाहता मराठा समाजाचा नवा पक्ष काढणार असल्याची घोषणा मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश दादा पाटील यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत केली.
 
सरकार मराठा समाजाच्या बाबतीत निष्क्रिय 

यावेळी बोलताना पाटील म्हणाले,” मराठा समाज आता वैफल्यग्रस्त झाला आहे. जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार होते तेव्हा देखील मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत आणि आता भाजप शिवसेना सत्तेत असताना देखील मराठा समाजाचा प्रश्न जसाच्या तासाच आहे. मराठा समाजाचे नेते फक्त मत गोळा करण्यापुरते आहेत. त्यामुळे मराठा समाजाच्या युवकांकडून वेगवेगळ्या सोशल नेटवर्किंग साईटस द्वारे सर्वेक्षण करण्यात आले त्यांची मते जाणून घेतली असता. मराठा समाजाचा वेगळा पक्ष स्थापन व्हावा यासाठी सर्वांची मान्यता मिळाली आहे. त्यामुळे येत्या पाडव्याच्या मुहूर्तावर रायरेश्वर येथे मराठा समाजाच्या नव्या पक्षाची स्थापना करण्यात येणार आहे अशी घोषणा सुरेश दादा पाटील यांनी केली”.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f69a3ea7-c0b4-11e8-9bad-eba478487a14′]

उदयनराजेंना महत्वाचे स्थान

मराठा समाजाच्या आंदोलनांमध्ये साताऱ्याचे  खासदार उदयनराजे भोसले यांना त्यावेळी मराठा समाजाच्या आंदोलनाचे नेतृत्व करण्याबाबत विचारले होते. तेव्हा त्यांनी आम्ही मराठा समाजाच्या सोबत आहोत असे सांगितले होते. त्यामुळे आता मराठा समाजाच्या नव्या पक्षाला देखील त्यांचा पाठिंबा असेल असे मत सुरेश दादा पाटील यांनी मांडले. उदययनराजे भोसले हे छत्रपती शिवरायांचे थेट वंशज आहेत त्यामुळे मराठा समाजाचा उदयनराजेंना नेहमी पाठिंबा असेल अशी भावना पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमाकरिता उदयनराजे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील असेही ते यावेळी बोलताना म्हणाले .

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मराठ्यांना फसवणारा पक्ष 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मराठ्यांना फसवणारा पक्ष आहे. त्यांनी देखील मराठा समाजाकरिता ठोस पावले उचली नाहीत त्यामुळे आता मराठा समाजाचा कोणत्याही पक्षावर भरवसा राहिलेला नाही. शिवसेना,काँगेस ,राष्ट्रवादी, भाजप या चारही पक्षांनी मराठा समाजाकरिता ठोस पावले उचलेली नाहीत त्यामुळे आता मराठा समाजाच्या हितासाठी नव्या पक्षाची स्थापना केली जाणार आहे. असे पाटील यांनी स्पष्ट केले.

आैरंगाबाद | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ‘अभाविप’चा राडा

[amazon_link asins=’B07BCGC13F,B011IRCV8C’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9baf2409-c0b5-11e8-8ad5-4fd7dd037834′]