Pune : विमानतळ परिसरात पादचारी महिलेच्या डोक्यात दगड मारून दागिने हिसकावले

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – शहरात लूटमार करणाऱ्या चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला असून, विमानतळ परिसरात पादचारी महिलेच्या डोक्यात दगड मारून दागिने दागिने हिसकावण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. दोन दिवसांपूर्वी हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी लोहगाव भागात राहणाऱ्या 55 वर्षीय महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मोपेडवरील अनोळखी दोन व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या निंबाळकर नगर परिसरात दुपारी चारच्या सुमारास घराजवळील दुकानातून दूध घेऊन फिर्यादी या घरी जात होत्या. त्यावेळी पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेला धक्का दिला. महिला रस्त्यात पडली. त्यानंतर चोरट्यांनी महिलेच्या डोक्यात दगड मारून तिचे दागिने हिसकावण्याचा प्रयत्न केला. या घटनेत महिलेच्या डोक्याला जखम झाली असून तिने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक एच. एस. गिरी तपास करत आहेत. शहरात गेल्या काही महिन्यापासून दागिने हिसकावण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. चोरटे अलगद गळ्यातील दागिने घोरून नेत आहेत.

बाजीराव रस्त्यावरील नातूबाग मैदानाजवळ सकाळी साडे सातच्या सुमारास एका महिलेचे ३० हजारांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी महिलेने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी या मंगळवारी मॉर्निंग वॉककरून घरी जात होत्या. यावेळी दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकवली आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक बोबडे तपास करत आहेत.