Pune : दारू पिऊन कार चालवताना स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या पोलिस निरीक्षकानं 4 जणांना उडवलं, एकाचा मृत्यू तर तिघे जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भरधाव वेगात जाणाऱ्या एका कारने पादचारी आणि भाजी विक्रेत्याला जोरदार धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाली आहे. कार चालक हा निवृत्त (स्वेच्छानिवृत्ती) पोलीस अधिकारी असून त्याच्या गाडीमध्ये दारुच्या बाटल्या सापडल्या आहेत. हा अपघात बालेवाडी येथील ममता चौकात घडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बालेवाडी येथील ममता चौकात मोठा अपघात झाला आहे. निवृत्त पोलीस अधिकारी संजय निकम यांनी पादचारी तसेच रस्त्याच्या बाजूला बसून भाजी विक्री करणाऱ्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात 1 जणाचा मृत्यू झाला आहे तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नागरिकांनी जखमी झालेल्या लोकांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, निकम हे दारु पिऊन गाडी चालवत होते, तसेच त्यांच्या गाडीत दारुच्या बाटल्या आढळून आल्या. या अपघातात एक व्यक्ती मृत्यूमुखी पडला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.