Pune : नवले ब्रिजजवळ भरधाव ट्रकचं ब्रेक फेल झाल्यानं भीषण अपघात, रिक्षा चालक जागीच ठार तर ट्रकनं 8 वाहनांना उडवलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अपघात प्रवण क्षेत्र म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या नवले ब्रिजजवळ एका ट्रकचा ब्रेक फेल होऊन भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. यात एका रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू झाला असून, 8 वाहनांना त्या ट्रकने उडवले आहे.

याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक चालक कात्रजकडून नवले ब्रिजकडे येत होता. यावेळी अचानक वाडा हॉटेलसमोर आल्यानंतर अचानक या ट्रेकचे ब्रेक फेल झाले. यावेळी त्याने समोरील एका रिक्षा आणि 7 मोठ्या वाहनांना उडवले. रिक्षाला धडक दिल्यानंतर रिक्षा चालक बाहेर पडला. यावेळी त्याला दुसऱ्या वाहनाने उडवले. यात गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर इतर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी वाहतूक पूर्वत करत जखमींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तर ट्रक चालकाला ताब्यात घेतले.

You might also like