Pune : जेष्ठ नागरिकाला सायबर चोरट्याने 10 हजार रुपयांना गंडवले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ऑनलाइन जेवण मागविण्यासाठी गुगलवर स्विगीचा फोन क्रमांक सर्च केल्यानंतर एका जेष्ठ नागरिकाला सायबर चोरट्याने 10 हजार रुपयांना गंडवले. जेष्ठ नागरिकाच्या बँकेची गोपनीय माहिती घेऊन फसवले आहे.

याप्रकरणी 83 वर्षीय जेष्ठ नागरिकाने कोथरुड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार सायबर चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कोथरुड येथील भागात राहतात. त्यांना बाहेरून जेवण मागवायचे होते. यासाठी त्यांनी गुगलवर स्विगीचा मोबाईल क्रमांक शोधला. यात त्यांना एक क्रमांक मिळाला. त्यावर फिर्यादी यांनी संपर्क साधला. तसेच त्यांना जेवण ऑर्डर केली. पण या चोरट्यांने त्यांना पेमेंट बाबत माहिती देत त्यांच्याकडून बँकेचे डिटेल्स घेतले. नंतर त्यांच्या खात्यातून ऑनलाइनरित्या 9 हजार 999 रुपये काढून त्यांची फसवणूक केली आहे. अधिक तपास कोथरुड पोलीस करत आहेत.