Pune : कोरेगाव पार्क परिसरात ज्येष्ठ नागरिकाच्या डोळयात मिरची पुड टाकून लुटलं

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – पुण्यातील लुटमारीच्या घटना थांबत नसून, कोरेगाव पार्क भागात जेष्ठ नागरिकाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तर कर्वेनगरला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसलावले आहे. तसेच येरवड्यात एकाला लुटले आहे.

याप्रकरणी कोरेगाव पार्क परिसरात राहणाऱ्या 60 वर्षीय जेष्ठ नागरिकांने पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार दोन दुचाकीवरील चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे शनिवारी रात्री त्यांच्या दुचाकीवरून घरी जात होते. कोरेगाव पार्क परिसरातील मॅक्स मुलर भवन समोर दोन दुचाकीवरून आलेल्या चार व्यक्तींनी त्यांना अडविले. त्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकली. त्यानंतर त्यांच्या डोक्यात कठीण वस्तूने मारहाण केली. तसेच त्यांच्याकडे असलेली ११ हजार रूपयांची रोकड असलेली बॅग हिसकावून पळून गेले. यानंतर त्यांनी पोलिसांना घटनेची माहीती दिली. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस अधिक तपास करत आहेत.

कर्वेनगर येथील भारती अपार्टमेंट येथे राहणाऱ्या 78 वर्षीय जेष्ठ महिलेच्या गळ्यातील 60 हजार रुपयांची मंगळसूत्र नेले आहे. फिर्यादी या रविवारी सायंकाळच्या सुमारास घराचे गेट उघडत होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आरोपी त्या ठिकाणी आले. त्यांना शिंदे कुठे राहतात, अशी विचारणा केली. त्यांच्या जवळ येऊन गळ्यातील ६३ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसका मारून पळून गेला. त्यांनी आराडा-ओरडा केला. पण तोपर्यंत चोरटे पसार झाला होते. अधिक तपास अलंकार पोलिस करत आहेत.

येरवडा परिसरात राहूल देविदास बनसोडे (वय ४६, लक्ष्मीनगर, येरवडा) यांना शनिवारी रात्री लुटले आहे. शनिवारी रात्री सव्वा सातच्या सुमाराज ते पायी जात होते. संतोष मेडीकलजवळ एका व्यक्तीने त्यांना तंबाखू व पैशाची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्यांनी त्यांच्यासोबत झटापट केली. त्यांच्या खिशातील २२ हजार रूपये किंमतीचे दोन मोबाईल खिशातून जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर पळून गेला. अधिक तपास येरवडा पोलिस करत आहेत.