Pune : हरवलेला रस्ता परत मिळणेबाबत लाक्षणिक उपोषण – डॉ. सिद्धार्थ धेंडे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – विमाननगर परिसरात सन 1990 च्या विकास आराखड्यामध्ये दर्शविलेल्या रस्त्याचा टीडीआर देण्यात आला असून तो वापरण्यातही आला आहे. असे असताना राज्य शासनाने 2017 च्या विकास आराखड्यामध्ये नवीन रस्त्याची आखणी केली आहे. प्रत्यक्षात 20 वर्षात हा रस्ता कुठे आहे असा प्रश्न पालिकेच्या अधिकाऱ्यांना पडला आहे. केवळ बांधकाम व्यावसायिकाच्या फायद्यासाठी आराखड्यात हा बदल करण्यात आला आहे. या प्रकरणी लवकरात लवकर सुनावणी घेऊन ‘हरवलेला’ रस्ता परत मिळवून द्यावा या मागणीसाठी लाक्षणिक उपोषण करणार असल्याचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

डॉ. धेंडे यांनी सांगितले की, विमाननगर येथील एका रस्ता 1990 मध्ये आखण्यात आला. याव्यतिरिक्त सन 2017 च्या विकास आराखड्यामध्ये तो रस्ता कायम ठेवून अजून एक रस्ता राज्य शासनाने परस्पर नकाशात दाखविला आहे. मात्र यानंतरही असे मनपाचे बांधकाम विभाग अधिकारी सांगत आहेत. याकरीता मी आयुक्तांसह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्याना वारंवार लेखी तक्रार देवून आपण यावर सुनावणी घ्यावी ही विनंती केली आहे.

पुणे मनपा अधिकाऱ्यांनी सन 1990 च्या रस्त्यावर व त्या नकाशाचा आधार घेवून सन 2000 साली या रस्त्याची ताबे यादी करून त्यास मोठा टिडीआर देखील देवून खर्ची केला आहे. या टीडीआरची जवळजवळ किंमत 25 कोटी पर्यंत जाते. व त्याकरीता 7665 स्क्वे. मीटर जागा ही पुणे मनपाच्या ताब्यात आलेली दर्शविलेली आहे. सन 2010 ते 2015 या काळामधल्या विकास आराखड्यामध्ये एकच रस्ता स.नं. 230 मधील हा नवीन एअरपोर्ट रोड पासून आतमध्ये विकास आराखड्यामधील रस्त्याला जावून मिळतो. हे सन 1990 ते 2015 पर्यंत व सन 2017 च्या विकास आराखडयामध्ये देखील दिसत आहे.

सन 2017 मध्ये विकास आराखड्यामध्ये एका मा. विधानसभेच्या सदस्याने पत्र देवून ह्या मुळ रस्त्याला लागून अजून एक रस्ता दर्शवावा ही विनंती केली आहे व सन 2017 च्या विकास आराखड्यामध्ये एक अर्धवट रस्ता दर्शविण्यात आला जो सन 1990 च्या विकास आराखड्यामध्ये तसेच सन 2000 च् ताबे यादी प्रमाणे दिला गेलेला टीडीआर तसेच जुन्या दर्शविलेल्या रस्त्याच्या बांधकामाच्या परवानग्या याबरोबर विसंगत दिसत आहे. त्याच बरोबर या अर्धवट रस्त्याला नागरीकांची ये – जा करणेकरीता कुठेही मदत होणार नाही.‌

सर्व विमाननगर रहिवाशांच्या वतीने पुणे मनपाच्या त्यावेळच्या आयुक्तांना हे निदर्शनास आणून दिले होते. इतकेच नाही तर सन 2019 मध्ये पुणे मनपाच्या बांधकाम विभागाने सन 1990 च्या विकास आराखड्यामधील व सन 2000 च्या ताबे यादीप्रमाणे तसेच सन 2017 मध्ये विकास आराखड्यामध्ये हा रस्ता दिसत आहे. त्यावर आपल्या बांधकाम परवानगी दिलेली आहे. हा मुळ रस्ता आहे. या रस्त्यावर सर्व विमाननगर रहिवाशांची मुख्य एअरपोर्ट रस्त्यावर ये- जा करता येवू शकते.

मनपाच्या बांधकाम विभागाने सन 2017 मध्ये दर्शविलेल्या अर्धवट रस्त्यावरती पुणे मनपाने ताबा घेतला नाही. त्यावर पुणे मनपाच्या अधिकाऱ्यांनीच बांधकामास परवानगी एक महिन्याच्या आत विकसकाने मोजणी करून आणावी असे हमीपत्र घेवून दिलेली आहे. आज तब्बल एक वर्ष पुर्ण झाले आहे. आतापर्यंत मोजणी न घेता देखील बांधकाम सर्रासपणे चालू आहे.‌ बांधकाम .विभाग यावर चालढकल करीत आहे. सन 1990 साली अस्तित्वात असलेल्या रस्ता खोडसाळपणे विकसक व राजकीय दबावापोटी तो बदलण्यात आला आहे. यावर तातडीने सुनावणी घेऊन निर्णय घ्यावा अन्यथा लाक्षणिक उपोषण करण्यात येईल असा इशारा आयुक्तांना दिल्याचे डॉ. धेंडे यांनी सांगितले.