पुणे : प्रोटेक्शन मनीसाठी हॉटेल व्यवस्थापकाला गोळ्या घालण्याची धमकी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

हॉटेल व्यवस्थापकाला फोन करुन हॉटेल मालकाला ५० हजारांची प्रोजेक्शन मनी देण्यास सांगून, न दिल्यास गोळ्या घालून जीवेमारण्याची धमकी देण्यात आली. मंगळवारी (दि.२४) रात्री आठच्या सुमारास फोन करुन धकमी देणाऱ्या सराईत गुन्हेगाराविरुद्ध
बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. ही कारवाई खंडणी विरोधी पथकाने केली.
[amazon_link asins=’B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8d8d0d24-91a6-11e8-9e6c-ff2f0b2a5e73′]

चार्लस उर्फ देवराज जेम्स थापा (वय-२७ रा. मिडीया पार्क सोसायटी, बिटी कवडे रोड, मुंढवा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. प्रकाश जयशंकर शुक्ला (वय-२८ रा. लक्ष्मीनगर, येरवडा) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे हॉटेल क्वॉलीटी इनमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करतात. मंगळवारी (दि.२४) रात्री आठच्या सुमारास त्यांना फोन आला. हेमंत पुजारी बोलत असल्याचे सांगून आरोपीने प्रोटेक्शन मनीची मागणी केली. तसेच हॉटेल मालकाचा नंबर मागितला. शुक्ला यांनी मालक अमेरीकेत असल्यााचे सांगून फोन नंबर नसल्याचे सांगितेल. त्यावेळी आरोपीने ५० हजार रुपयांची प्रोटेक्शन मनीची मागणी करुन न दिल्यास हॉटेलमध्ये येऊन गाेळ्या घालून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपीने पुन्हा फोन करुन दरमहा ५० हजार रुपायांची मगणी करुन पैसे दिले नाही तर सर्वांना गोळ्या घलण्याची धमकी दिली.

शुक्ला यांनी पोलिसांकडे फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी मोबाईल फोनची तात्रीक माहिती घेतली. त्यावेळी हा फोन चार्लस उर्फ देवराज जेम्स थापा याचा असल्याचे उघडकीस आले. थापा याने हेमंत पुजारी याचे नाव वापरुन प्रोटेक्शन मनीची मागणी केली. पोलिसांनी थापाला अटक केली आहे. थापा याने ५ जुलै रोजी देखील फोन करुन प्रोटेक्शन मनीची मागणी केली होती.

अटक करण्यात आलेल्या देवराज थापा विरुद्ध २०१४ मध्ये शिवाजीनगर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल आहे. २०१४ मध्ये थापा याने पुण्यातील एका हॉटेल व्यवसायिकाकडे १ कोटी रुपयांची खंडणी मागीतली होती. त्यावेळी त्याला खंडणी विरोधी पथकाने अटक केली होती.
[amazon_link asins=’B0784BZ5VY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9478bf55-91a6-11e8-bf10-ddb8557d0ff0′]

ही कारवाई गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त प्रदिप देशपांडे, पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव, पोलीस उप निरीक्षक राहुल घुगे, पोलीस कर्मचारी अविनाश मराठे, भाऊसाहेब कोंढरे, रमेश गरुड, उदय काळभोर, महेश कदम, महेश शिंदे, संतोष मते, फिरोज बागवान, शिवानंद बोले यांच्या पथकाने केली.