Pune : कोंढव्यात चाकूच्या धाकाने दुचाकीस्वारास लुटले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – चाकूच्या धाकाने दुचाकीस्वारास चौघांनी लुटल्याचा प्रकार कोंढवा परिसरात घडला आहे. मोबाईल व रोकड असा २५ हजारांचा ऐवज पळवला आहे. खडीमशीन चौक ते पिसोळी रस्तावर ही घटना घडली आहे.

याप्रकरणी सर्फराज मन्सूर अली अहमद (वय ३०, रा. पिसोळी ) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्फराज शनिवारी संध्याकाळी घरी पिसोळीला चालले होते. यावेळी बुलेटवर आलेल्या दोघांनी त्यांना अडविले. त्यानंतर पाठीमागून दुचाकीवर आणखी दोघे आले. त्यांनी चाकूचा धाक दाखवत त्याच्याकडून मोबाईल, रोकड मिळून २५ हजारांचा ऐवज चोरुन नेला. अधिक तपास कोंढवा पोलिस करीत आहेत.