Pune : मांजरी उपबाजारात चोरी करणाऱ्या महिलेला कर्मचाऱ्यांनी पकडले

पुणे – कृषि उत्पन्न बाजार समितीच्या मांजरी उपबाजारामध्ये गर्दीचा फायदा घेत एका महिलेने पर्स चोरली. त्यामध्ये आठ हजार पाचशे रुपये होते. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे पैशासह पाकिट संबंधित महिलेला मिळाले. पाकिटमार महिलेला पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे मांजरी उपबाजार समितीप्रमुख विजय घुले यांनी सांगितले.

घुले म्हणाले की, बाजार समितीच्या परवानाधारक जया पवार (रा. येरवडा, पुणे) या शेतमाल खरेदी करण्यासाठी बुधवारी (दि. 5 मे 2021) आल्या होत्या. यावेळी गर्दीमध्ये एका महिलेने लहान मुलाला घेऊन पवार यांच्या पर्स (आठ हजार 500 रुपये) चोरी करून पळून जात होती. ही माहिती समजताच पवार यांच्या वाहन चालकाच्या मदतीने बाजार समितीचे विभागप्रमुख विजय घुले व त्यांचे कर्मचारी, सुरक्षारक्षक, अधिकारी यांनी तपास सुरू केला. दरम्यान चोरी करणाऱ्या महिलेने पैशाचे पाकीट गेट पासून काही अंतरावर टाकून दिल्याचे निदर्शनास आले. रोख रकमेसह पैशाचे पाकिट पवार यांना घुले यांनी दिले. पाकिटमार महिलेला मुलासह हडपसर पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे त्यांनी सांगितले.