Pune : जाब विचारणाऱ्या तरुणावर कोयत्याने वार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दुचाकी वेडीवाकडी चालवत असल्याने याबाबत जाब विचारणाऱ्या तरुणावर कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केल्याची घटना घडली. आंबेगाव बुद्रुक येथील एका महाविद्यालयाच्या परिसरात हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी करण (पूर्ण नाव नाही ) , व्यंकटेश अशोक सोलंकी याच्यासह इतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यता आला आहे. स्वप्निल अंकुश उभे (वय २० रा. आंबेगाव ) बुद्रूक असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनाी दिलेल्या माहितीनुसार, तीन दिवसांपुर्वी रात्री नउच्या सुमारास स्वप्निल दुचाकीवरुन घरी चालले होते. त्यावेळी करणने त्याला दुचाकी आडवी मारली. त्यामुळे स्वप्निलने त्याला जाब विचारला असता, करणला राग आला. त्यामुळे त्याने इतर साथीदारांना बोलावून स्वप्निलवर कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले. अधिक तपास भारती विद्यापीठ पोलीस करीत आहेत.