Pune : तरूणाला अडवून दाखविला कोयत्याचा धाक, खिशातील रक्कम अन् मोबाईल लांबवला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – तरुणाला अडवून कोयत्याचा धाक दाखवत खिशातील 80 रुपये व मोबाईल जबरदस्तीने काढून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. येरवडा भागात ही घटना घडली असून, पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

नीलेश उर्फ पिन्या संजय साळवे (वय २१) आणि राकेश उर्फ सुरेश साळवे (वय २२, दोघेही रा. यशवंतनगर, येरवडा) यांना अटक केली आहे. याप्रकरणी अक्षय गोरखे (वय २४, रा. वाघोली ) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अक्षय शनिवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास घराचे भाडे देण्यासाठी पैसे अण्यास जात होता. यावेळी आरोपी या हातात कोयते, बांबू व घातक शस्त्र घेऊन थांबले होते. आरडाओरडा करत परिसरात दहशत माजवत होते. यावेळी त्यांनी अक्षयला अडविले. तसेच कोयत्याचा धाक दाखविला. त्याच्या खिशातील ८० रुपये व मोबाईल काढून घेत मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी कामावरुन घरी जात असलेल्या समीर कुरेशी यांनाही धमकाविले आहे. अधिक तपास येरवडा पोलिस करीत आहेत.