Pune : सिंहगड परिसरात एका सोसायटीच्या टाकीत पडून तरुणाचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सिंहगड Sinhagad परिसरात एका सोसायटीच्या टाकीत पडून तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रविवारी हा प्रकार घडला आहे. विठ्ठल अंकुश वायकुळे (वय 30, रा. पार्थवी सोसायटी, नर्हे) असे मृत्यु झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सिंहगड रोड Sinhagad पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठल अविवाहित आहे. तो मूळचा लातूर येथील आहे. वारजेतील एका औषध निर्माण कंपनीत तो कामाला होता. पार्थवी सोसायटीतील सदनिकेत तो दोन मित्रांबरोबर राहत होता. दरम्यान रविवारी तो सोसायटीत असणाऱ्या पाण्याचा टाकीत पडल्याचे समोर आले. त्याच्या मित्राने सिंहगड रोड पोलिसांना ही माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शनिवारी रात्री तो मित्राकडे पार्टी करायला गेला होता. तेथून मध्यरात्री तो सोसायटीत आला. पण, सोसायटीच्या टाकीत नेमका कसा पडला, हे समजू शकलेले नाही. अधिक तपास उपनिरीक्षक जाधव करत आहेत.

Also Read This : 

दिलासादायक बातमी ! कोरोनाच्या केस होताहेत कमी, 12 आठवड्यानंतर मृत्यूंचे आकडेसुद्धा घसरले

‘या’ वयात सर्वात जास्त मिळतो शरीरसुखाचा आनंद, जाणून घ्या कालावधी

‘प्रेमा’ला विरोध झाल्याने चुलत बहिण-भावाने केली ‘आत्महत्या’

Pune : भरधाव दुचाकीनं रस्ता क्रॉस करणार्‍या 7 वर्षाच्या सियाला उडवलं; चिमुरडी गंभीर जखमी

रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांवर निशाणा, म्हणाले – ‘राज्याला केंद्राप्रमाणे कंपन्या विकून पैसे मिळत नाहीत’

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! मराठा विद्यार्थी आणि उमेदवारांना 10 टक्के EWS आरक्षणाचा लाभ मिळणार

Video : ‘महाविकास’ सरकारमधील नेत्यांवर भडकले फडणवीस, म्हणाले – ‘ओबीसी आरक्षणाचा मुडदा पडत असताना मंत्री मोर्चे काढत होते’