Pune : कोंढव्यात ओळख न दिल्याच्या कारणावरून 10 जणांच्या टोळक्याकडून तरूणाला बेदम मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात कडक लॉकडाऊन असताना देखील रस्त्यावरची गुन्हेगारी कमी होत नसल्याचे वास्तव असून, गल्ली बोळात टोळके राडे घालत आहेत. कोंढव्यात केवळ त्याने ओळख न दिल्याच्या कारणावरून 10 जणांच्या टोळक्‍याने तरुणाला बेदम मारहाण केली आहे.

याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात फैजल मुजाहिद, तोसिफ खान, अबिद मोकाशी, शहबाज, इरशाद शेख, तजमुल पठाण आणि इतर पाच ते सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आसिफ मौलाना शेख (वय 35) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या दोन मित्रांसोबत भाग्योदय नगर येथील लेडी हलीमा शाळेसमोर बसले होते. त्यावेळी याठिकाणी फैजल मुजाहिद हा येथे आला. तसेच फिर्यादी यांचा मित्र तनवीर शेख याच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. यापूर्वी ओळख न दिल्याच्या कारणावरून त्यांच्यात बाचाबाची देखील झाली. याचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादी यांच्या दोन्ही मित्रांना बेदम मारहाण केली. तर ऑफिसची तोडफोड करत नुकसान केली आहे. अधिक तपास कोंढवा पोलिस करत आहेत.