Pune Aam Aadmi Party | पुणे महापालिकेच्या निवडणुकीत आम आदमी पक्ष सर्व जागा लढवणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Aam Aadmi Party | राज्यातील प्रलंबित स्थानिक स्वराज संस्थांच्या (Local Body Election) निवडणुकांचा कार्यक्रम 2 आठवड्यात जाहीर करण्याच्या सूचना सुप्रीम कोर्टानं (Supreme Court) दिल्या नंतर पुण्यातील सर्वच पक्षांनी आपण निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, पुणे महापालिकेच्या निवडणुकीत (Pune Municipal Corporation (PMC) Election) पुणे आम आदमी पक्ष (Pune Aam Aadmi Party) सर्व जागा विजय कुंभार (Vijay Kumbhar) यांच्या नेतृत्वात लढवणार असल्याचे आम आदमी पक्षाचे राज्याचे प्रवक्ते डॉ अभिजित मोरे (State Spokesperson Dr. Abhijit More) यांनी सांगितले.

 

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल आता वाजले असून विजय कुंभार यांच्या नेतृत्वात आम आदमी पक्ष (Pune Aam Aadmi Party) महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्व जागा लढविण्यासाठी सज्ज झाला आहे. पंजाब विधानसभेतील (Punjab Legislative Assembly) दणदणीत विजयानंतर आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावले आहे. सर्वसामान्य पुणेकरांकडून विकासाच्या दिल्ली मॉडेलला (Delhi Model) आणि प्रामाणिक राजकारणाच्या आवाहनाला अतिशय सकारात्मक प्रतिसाद भेटत आहे. (Pune AAP)

 

गेल्या काही महिन्यांपासून आम आदमी पक्ष प्रभाग पातळीवर कोपरा सभा, गृहभेटी, तिरंगा यात्रा या माध्यमातून जनसंपर्क वाढवण्याचे काम करत आहे. निवडणूक मेळावे आणि सदस्य नोंदणी अभियानाच्या माध्यमातून संघटन वाढवण्याचे काम करत आहे. पुणे मनपा पातळीवरील सर्वसामान्यांचे जिव्हाळ्याचे अनेक मुद्दे आम आदमी पक्षाने मांडले आहेत. पालिकेतील भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उघडकीस आणली आहेत. जनसामान्यांच्या प्रश्नावर आंदोलने केली आहेत. येत्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये विकासाचे दिल्ली मॉडेल सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवून “संधी द्या, सुविधा घ्या” हा नारा देत लोकांना साद घालण्याचे आम आदमी पक्षाने ठरविले आहे.

Web Title :-  Pune Aam Aadmi Party | Aam Aadmi Party will contest all the seats in Pune Municipal Corporation elections


Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा 

7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी ! जुलैमध्ये पुन्हा महागाई भत्त्यात वाढ (DA) होण्याची शक्यता

How To Prevent Sleep In Office Time | दिवसा ऑफिसमध्ये झोपही येते का? ‘या’ सोप्या उपायांनी फायदे मिळू शकतील

PMC GST Income | महापालिकेला चालू आर्थिक वर्षात GST तून 150 कोटी रुपये अधिक मिळणार

Pune NCP | महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस सज्ज, तिकीट वाटपात ओबीसींना न्याय देणार; शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचे आश्वासन

Devendra Fadnavis on Aditya Thackeray | देवेंद्र फडणवीस यांचा आदित्य ठाकरेंना खोचक टोला, म्हणाले – ‘मर्सिडिज बेबीला संघर्ष काय कळणार ?’ (व्हिडीओ)