Pune Aam Aadmi Party | प्रशासकांना हाताशी धरून अजित पवार यांनी बालगंधर्व रंगमंदिर पाडण्याचा निर्णय घेतला, आम आदमी पक्षाचा गंभीर आरोप

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Aam Aadmi Party | बालगंधर्व रंगमंदिर (Balgandharva Rangmandir) हा पुण्याचा सांस्कृतिक ठेवा आहे. या ठेव्याचा पुणेकरांना सार्थ अभिमान आहे. हे बालगंधर्व रंगमंदिर पाडण्याचा निर्णय पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि प्रशासक विक्रम कुमार (Administrator Vikram Kumar) यांनी घेतलेला आहे. माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Former Mayor Muralidhar Mohol) यांनी त्याचे स्वागत केले आहे. 2018 साली मुरलीधर मोहोळ यांनी बालगंधर्व रंगमंदिर पाडण्याचा प्रस्ताव आणला होता आणि त्याला त्यावळी राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) विरोध केला होता. आता महानगरपालिकेची (Pune Municipal Corporation (PMC) मुदत संपल्यावर नगरसेवकांची कोणतीही कटकट राहिली नसताना प्रशासकांना हाताशी धरत जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी हा निर्णय घेतला आहे, असा आरोप पुणे आम आदमी पार्टीने (Pune Aam Aadmi Party) केला आहे.

 

भाजप-राष्ट्रवादी यांची अभद्र युती
बालगंधर्व रंगमंदिर पाडण्यासाठी भाजप (BJP) व राष्ट्रवादी यांची अभद्र युती झाल्याचे दुर्दैवी चित्र पुणेकरांना बघायला मिळत आहे. या निर्णयाबाबत कोणतीही पारदर्शकता ठेवलेली नाही. पुणेकर जनतेला, कलाकारांना, रसिकांना विश्वासात न घेता हा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयाविरोधात आज पुणे आम आदमी पक्षाने (Pune Aam Aadmi Party) बालगंधर्व रंगमंदिरसमोर आंदोलन (Agitation) करून याचा निषेध व्यक्त केला आणि या निर्णयाबाबत अनेक शंका व प्रश्न उपस्थित केले.

बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास कोणासाठी?
2018 साली सुद्धा हेच बालगंधर्व रंगमंदिर पाडण्याचा निर्णय मुरलीधर मोहोळ स्थायी समितीचे अध्यक्ष (Standing Committee Chairman) असताना घेतला गेला होता. ज्याला जनसामान्यांनी आणि कलाकारांनी कडाडून विरोध केला, त्यामुळे हा निर्णय त्यावेळी मागे घ्यावा लागला होता. आता महानगरपालिकेतील नगरसेवकांची मुदत संपल्यानंतर प्रशासकाची नेमणूक झाल्यानंतर अशा पद्धतीचा एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला जात आहे. ही सर्व प्रक्रिया अपारदर्शक पद्धतीने जनसामान्यांना व कलाकारांना पुरेशी माहिती न देता रेटून नेली जात आहे. बालगंधर्व रंगमंदिर पाडून त्याचा केला जाणारा तथाकथित पुनर्विकास हा नक्की कोणासाठी ? ठेकेदारासाठी? की पुणेकर रसिक जनता व कलाकारांसाठी? सामान्य जनतेची आणि नगरसेवकांची कटकट नको म्हणून प्रशासक नेमला यावर जाणीवपूर्वक हा निर्णय घेतला जात आहे का? या प्रश्नाचे उत्तर महानगरपालिका प्रशासन पालकमंत्री अजित पवार, मनपा आयुक्त विक्रम कुमार व माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी द्यायला हवं, अशी मागणी आम आदमी पक्षाने केली आहे.

 

नक्की कशासाठी बालगंधर्व रंगमंदिर पाडले जात आहे?
दरवेळी असा प्रस्ताव देताना अथवा निर्णय घेताना वेगवेगळी कारणे दिली जातात. 2018 साली आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा (International Standard Facilities) देण्याचे कारण पुढे करत बालगंधर्व रंगमंदिर पाडण्याचा प्रस्ताव मांडला गेला होता.
आता 2022 मध्ये मेट्रोसाठी (Pune Metro) लागणारे पार्किंग उपलब्ध व्हावं म्हणून बालगंधर्व रंगमंदिर पाडण्याचा निर्णय होत आहे, अशी चर्चा आहे.
नक्की कशासाठी बालगंधर्व रंगमंदिर पाडले जात आहे? तशी मागणी कोणी केली आहे ? याबाबत कुठलीही माहिती सार्वजनिकरीत्या जाहीर केलेली नाही.
ही माहिती सार्वजनिक करावी,
पारदर्शकता ठेवावी आणि पुणेकर रसिक जनता, कलाकार, प्रतिष्ठित पुणेकर नागरिक यांना विश्वासात घेत बालगंधर्व रंगमंदिरबाबत पुढील वाटचाल निश्चित करावी,
अशी मागणी आम आदमी पक्षाचे राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार (Pune City Working President Vijay Kumbhar) यांनी केली आहे.

बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास भरकटला जाईल, याची भीती पुणेकरांच्या मनामध्ये आहे.
पुनर्विकासाच्या नावाखाली महानगरपालिकेच्या इतर नाट्यगृहमध्ये पालिकेने खेळखंडोबा अगोदरच मांडलेला आहे.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाची (Lokshahir Annabhau Sathe Natyagruha) लाखो रुपयांची साऊंड सिस्टिम चोरीला जाण्याचा प्रकार याच पुण्यात घडलेला आहे.
बालगंधर्व रंगमंदिराच्या स्वच्छतेबाबत उदासीन असलेली पुणे महानगरपालिका आता पुनर्विकास प्रकल्पाच्या नावाखाली काय करणार आहे,
ऐतेहासिक ठेव्याचे काय होईल या कल्पनेनेच सर्वसामान्य रसिक पुणेकर घाबरलेले आहेत.

 

Web Title :- Pune Aam Aadmi Party | Ajit Pawar decides to demolish Balgandharva Rangmandir by holding hands with administrators, serious allegations of Aam Aadmi Party

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Supriya Sule on Navneet Rana | ‘…म्हणून मी नवनीत राणा या विषयाकडे गांभीर्याने बघत नाही’ – खा. सुप्रिया सुळे

 

Amisha Patel Hugs Sanjay Raut | अमिषा पटेलनं दिली थेट संजय राऊतांना ‘जादू की झप्पी’..पाहा व्हायरल व्हिडिओ..!

 

D Gang Terror Funding Case | मुंबईत NIA च्या धाडीत धक्कादायक माहिती समोर, दाऊदचा डाव उधळला ! आणखी 87 जण ‘रडार’ वर