Pune Aam Aadmi Party | सामान्य जनतेशी संवाद साधण्यासाठी पुण्यात ‘आप’ कडून कोपरा सभा मोहिमेचं आयोजन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Aam Aadmi Party | नागरिकांकडून वसूल केला जाणारा कर आणि त्या मोबदल्यात मिळणार्‍या सुविधा यावर आम आदमी पक्षातर्फे (Pune Aam Aadmi Party) पुण्यात (Pune News) जनजागृती मोहिम राबवली जात आहे. या पार्श्वभूमीवर शहराच्या कानाकोपर्‍यात ठिकठिकाणी कोपरा सभा (Corner Meeting) घेण्यात येत आहेत. यावरुन सामान्य जनतेशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जात असल्याचं सांगण्यात आलं आहे.

 

आम आदमी पक्षाकडून (Pune Aam Aadmi Party) प्रत्येक प्रभागामध्ये कमीतकमी 5 ते 10 कोपरा सभा घेतल्या जाणार आहेत.
स्थानिक समस्या खेरीज प्रचंड इंधन दरवाढ, घरगुती कुकिंग गॅसचा हजाराच्या घरात पोहोचलेला दर,
महागडी वीज हे सामान्य माणसाचे जगणे मुश्कील करून सोडणाऱ्या मुद्द्यांना या कोपरा सभाच्या माध्यमातून ऐरणीवर घेतले जाणार असल्याचं म्हटलं आहे.

 

काल (शुक्रवारी) मामलेदार कचेरी (Mamaledar Kacheri), खडकमाळ आळी (Khadakmal Aali) आणि मंडई भागामध्ये (Market Area) झालेल्या पहिल्या कोपरा सभेत ‘आप’ चे वाहतूक विंग राज्य अध्यक्ष श्रीकांत आचार्य (Srikant Acharya) यांनी महागाईचा मुद्दा उपस्थित करत, ”बिकट काळासाठी सजग राहुन सामान्य माणसाच्या जीवनाशी संबंधित बाबींबाबत अभ्यासपूर्ण उपाययोजना अंमलात आणण्याची क्षमता आणि साफ नियत असणार्‍या आप बरोबर उभे राहण्याचे,” आव्हान केले आहे.

दरम्यान, या भागातील ‘आप’ चे युवा नेते पियुष हिंगणे (Piyush Hingane) यांनी या प्रभागातील स्थानिक समस्यांकडे लक्ष वेधले.
यावेळी नागरिक व ‘आप’ चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, अश्याच प्रकारच्या कोपरा सभा शहरातील सर्व प्रभागांत अधिकाधिक ठिकाणी आपतर्फे नियोजित करण्यात आल्या असल्याचं ‘आप’ च्या मंजुषा नयन (Manjusha Nayan) यांनी सांगितलं.

 

 

Web Title :- Pune Aam Aadmi Party | Organizing a corner meeting campaign from AAP in Pune to interact with the general public

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा