Pune | गणपती विसर्जन मिरवणुकीला लकडी पुलावरील मेट्रो पुलाचा अडथळा, चर्चेसाठी तात्काळ बैठक बोलवा, आबा बागुल यांची मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरात (Pune) मेट्रोचे काम (Metro work) प्रगतीपथावर असून लकडी पूल, डेक्कन येथून मेट्रो मार्गाच्या पुलाचे काम चालू आहे. हा पूल लकडी पूलापासून 5.45 ते 6 मीटर इतका उंच आहे. मेट्रोच्या पूलाचा तळ व लकडी पूलाचा रस्ता म्हणजेच अंदाजे 20 फुट इतका उंच लकडी पूलावरून मेट्रोचा पूल झाल्यास पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणूकीस (Ganpati immersion procession) मोठया प्रमाणात अडथळा होणार आहे. याबाबत तात्काळ मार्ग काढण्यासाठी बैठक बोलवावी (Call a meeting) अशी मागणी पुणे महापालिकेतील (Pune Municipal Corporation) काँग्रेस पक्षाचे नेते आबा बागुल (Congress leader Aba Bagul) यांनी महापालिका आयुक्त (Municipal Commissioner) यांच्याकडे केली आहे.

पुणे शहर हे सांस्कृतिक शहर आहे. पुणे शहरात सार्वजनिक गणेशोत्वस मोठया उत्साहात साजरा होतो. या उत्सवास 125 हून अधिक वर्ष झाले असून ही परंपरा पुणेकर मनोभावाने जपत आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव आता जगभरात साजरा होत आहे. देशाच्या स्वातंत्र चळवळीत पुण्याच्या गणेशोत्सवासाचे योगदान आहे. कोरोना (Corona) काळात मागील वर्षी व यंदाच्या वर्षात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शासनाने अटी व शर्ती दिलेल्या आहेत. कोरोनाचा काळ संपल्यानंतर पुन्हा त्याच उत्साहात सार्वजनिक गणेशोत्सव (Ganeshotsav) साजरा होणार आहे.

Belgaum Corporation Election result | बेळगाव महापालिकेत भाजपचा झेंडा, BJP स्पष्ट बहुमतात

पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवात सजावट, देखावे व विसर्जन मिरवणूक यामध्ये विसर्जन मिरवणूकीस खूप मोठे महत्व आहे. विसर्जन मिरवणूकीमध्ये मोठे आकर्षक रथ, विदयुत रोषणाई, समाज प्रबोधन व मार्गदर्शन करणारे देखावे, कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करणारे देखावे अशा प्रकारची सजावट गणेश मंडळाचे कार्यकर्ते मोठया उत्साहाने करून लक्ष्मी रस्ता (Lakshmi Road), कुमठेकर रस्ता Kumthekar Road), टिळक रस्ता, केळकर रस्ता याठिकाणाहून विसर्जन करण्यासाठी अलका चौक (Alka Chowk) येथून मिरवणूक काढतात.

अलका चौक येथे मानाचा पहिला कसबा गणपती (Kasba Ganpati), मानाचे उर्वरित गणपती व शेकडो गणेश मंडळांच्या मिरवणूका लकडी पूलावरून खंडूजी बाबा चौक येथील विसर्जन घाटावर गणपती विसर्जनासाठी येत असतात. त्यानंतर कर्वे रस्यावरून एस.एम जोशी पूल मार्गे तसेच गोखले रस्ता व अन्य रस्ते येथून गणेश मंडळे परत जातात. कर्वे रस्त्यावर देखील मेट्रोचे स्टेशन (Metro station) झालेले असून याठिकाणाहून जाताना अडथळा निर्माण होणार आहे. विसर्जन मिरवणूकीतील रथ, रोषणाई यांची उंची साधारण 35 फुट ते 45 फुटापर्यंत असते. पुणे शहरातील विसर्जन मिरवणूकीचे थेट प्रक्षेपण जगभरातून बघितले जाते. परदेशातून नागरिक खास पुणे शहराची विसर्जन मिरवणूक बघण्यासाठी येत असतात.

श्रींचे विसर्जन मिरवणूक हा पुणेकरांचा अत्यंत जिव्हाळयाचा विषय असल्याने या विषयी विचार विनिमय
करणे गरजेचे आहे. गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणूक ही परंपरा थांबवता येणार नाही व विसर्जन
मिरवूणकीस अडथळा होत असल्यास यावर सविस्तर चर्चा करणेसाठी मेट्रोचे अधिकारी, महानगरपालिका
प्रशासन व पक्षनेते यांची बैठक तात्काळ बोलवावी अशी मागणी आबा बागुल यांनी महापालिका आयुक्त यांचे
कडे केलेली आहे.

हे देखील वाचा

Kirit Somaiya | ‘दोन्ही अनिल लवकरच जेलमध्ये जाणार’ – किरीट सोमय्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune | Aba Bagul demands immediate meeting for discussion on obstruction of metro bridge on wooden bridge

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update