मित्राला भेटायला आला आणि लिफ्टमधे अडकला ; अग्निशमन दलाच्या जवानांनी केली सुटका

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मित्राला भेटण्यासाठी गेलेला मुलगा लिफ्टमध्ये अडकला. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रमानंतर मुलाची सुटका करण्यात आली. हा प्रकार येवलेवाडी येथील सृष्टी सोसायटीत आज सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. साहिल पोटफोडे (वय-११) असे सुटका करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे.

साहिल मित्राला भेटण्यासाठी गेला होता. सोसायटीची इमारत अकरा मजली असल्याने साहिल लिफ्टने जात होता. लिफ्टची गियर वायर अचानक तुटल्याने चौथ्या मजल्यावर अडकला होता. रहिवाशांनी याची माहिती अग्निशमन दलाला देताच कोंढवा खुर्द अग्निशमन केंद्राचे जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले. श्री सृष्टी सोसायटी येथे पोहचल्यावर जवानांनी साहिलला आवाज देऊन तो व्यवस्थित असल्याची खात्री केली.

जवानांनी पाचव्या मजल्यावर धाव घेऊन मोठ्या दोरीच्या साह्याने लिफ्टला बांधून स्थिर करत जास्त धोका होणार नाही याची खबरदारी घेतली. जवानांनी हायड्रोलिक बोल्ड कटर, सर्क्युलर सॉ व टुल किट वापरुन लिफ्टची जाळी व पत्रा कापून साहिलची सुमारे अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर सुखरुप सुटका केली. हि कामगिरीमधे कोंढवा खुर्द अग्निशमन केंद्राचे वाहन चालक शरद गोडसे तसेच जवान अजित बेलोसे, निलेश लोणकर, मंगेश टकले, रवि बारटक्के यांनी सहभाग घेतला.

आरोग्यविषयक वृत्त

गरोदरपणात ‘हे’ ४ ब्युटी प्रॉडक्ट कधीही वापरू नका

भाजलेल्या ठिकाणी चुकूनही लावू नका ‘या’ गोष्टी

जाणून घ्या गुणकारी आवळ्याचे फायदे

‘हाफकिन’मध्ये किफायतशीर औषधांची होणार निर्मिती

‘ग्रीन टी’ प्रमाणात घ्या… नाहीतर उद्भवू शकतात ‘या’ समस्या

मोडलेल्या हाडावर ‘गरम’ वस्तू टाकल्यास होईल नुकसान ; घ्या काळजी

चॉकलेट वॅक्सचे ‘हे’ फायदे, जाणून घ्या

पोटाची चरबी कमी न होण्याची ‘ही’ ९ मोठी कारणे, त्यासाठी ‘हे’ करा

वजन कमी करण्यासाठी ‘हे’ खाऊ नका

मासिक पाळीच्या दरम्यान विचार पूर्वक निवडा वापरण्यात येणारी साधने

Loading...
You might also like