पोलीस चौकीत गुंडाचा राडा, महिला उपनिरीक्षकाला शिवीगाळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

परिसरात दहशत निर्णाण करणाऱ्या गुंडाला पोलीस चौकीत आणले असता त्याने पोलीस चौकीत गोंधळ घातला. तसेच त्याच्या सोबत असलेल्या महिलेने महिला पोलीस उपनिरीक्षकास शिवीगाळ करुन धक्कबुक्की केल्याची घटना नऱ्हे पोलीस चौकीत घडली.

मयुर बापु हांडे (वय-२३ रा. कुटे मळा, नऱ्हे, पुणे) आणि एका महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई गोरखनाथ चिनके यांनी फिर्याद दिली आहे.
[amazon_link asins=’B07DRJ4HD6,B07811ZTKF’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’bd1d9dd1-b9a4-11e8-963c-ab83a148891a’]

आरोपी हांडे हा मानाजीनगर परिसरात दहशत निर्माण करत होता. नऱ्हे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशीसाठी नऱ्हे पोलीस चौकीत आणले. हांडे आणि त्याच्या सोबत असलेल्या महिलेने चौकीमध्ये गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तसेच त्याने आत्महत्या करण्याची धमकी दिली. तर महिलने पोलीस चौकीतील महिला पोलीस उपनिरीक्षक पाटील यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. या दोघांवर सरकारी कामात अथडळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सिंहगड रोड पोलीस करीत आहेत.

पोलीसनामाचे फेसबुक पेज लाईक करा.

पोलीसनामाला ट्विटरवर फाॅलो कर.

पोलीसनामाचे युट्यूब चॅनेलला सब्सक्राईब करा.

पोलीसनामाच्या टेलिग्राम चॅनेलला जाॅईन व्हा.