Pune : महिलेकडून साडे 4500 रुपयांची लाच घेताना कारागृह कर्मचाऱ्यास अटक

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – येरवडा कारागृहात दिराला साहित्य देण्यासाठी महिलेकडून साडे चार हजार रुपयांची लाच घेताना कारागृह कर्मचाऱ्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. काही वेळा पूर्वी ही कारवाई करण्यात आली आहे.

संदीप साळुंखे असे रंगेहात पकडण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संदीप कारागृह विभागात कार्यरत आहेत. गेटवर त्यांची ड्युटी आहे. यातील तक्रारदार महिलेचा दिर एका गुन्ह्यात कारागृहात आहे. त्याला काही साहित्य तक्रारदार यांना द्यायचे होते. यावेळी तक्रारदार यांना लोकसेवक संदीप याने 5 हजार रुपयांची लाचेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदार यांनी याबाबत एसीबीकडे तक्रार केली होती. या तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज तडजोडीअंती साडे चार हजार रुपयांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले.

You might also like