पुणे : मीटर रिडींग घेणारा 15 हजारांची लाच घेताना अँटी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मीटरचे रिडींग घेण्यासाठी महावितरणकडून नेमण्यात आलेल्या एका कंत्राटी कामगाराला 15 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. सोमवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली.

शांताराम पोपट सोनवणे (वय 33) असे पकडण्यात आलेल्या कामगारांचे नाव आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

यातील तक्रारदार  यांचे घरघुती वापराचे आणि व्यवसायिक वापराचे दोन स्वतंत्र मीटर आहेत.

तर शांताराम याला महावितरणकडून महावितरण प्राधिकरण उपविभाग निगडी येथे मीटरचे रिडींग घेण्यासाठी कंत्राटी पद्धतीने नेमले आहे.

दरम्यान यातील तक्रारदार यांच्या घरघुती वापराच्या मीटरला व्यावसायिक दराने दंड न लावण्यासाठी आणि घरघुती वापराच्या मीटरला व्यावसायिक दराने आकारणी न करण्यासाठी 25 हजार रुपयांची लाच मागितली. त्यांनतर तक्रारदार यांनी याबाबत एसीबीकडे तक्रार केली होती. त्याची पडताळणी करण्यात आली. त्यात लाच मगितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सोमवारी रात्री उशिरा शांताराम याला तडजोडीअंती 25 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले.