25 हजाराच्या लाचेची मागणी करणार्‍या महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यासह दोघे अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – बंद केलेले वीज कनेक्शन पुन्हा जोडून देण्यासाठी 25 हजाराची लाच मागितल्याप्रकरणी शिरूर तालुक्यातील राजणगाव विभागाच्या महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यासह दोघांना एसीबीच्या पथकाने अटक केली. त्यांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, यापुर्वीही दिपक गव्हाणे याला संतोष पंचरास यांच्या सांगण्यावरून 12 हजार रुपयांची लाच घेतना पकडण्यात आले होते.

संतोष नानासाहेब पंचरास व मदतनीस दिपक कामाजी गव्हाणे (वय 37, रा. अण्णापूर, ता. शिरूर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर रांजणगांव एमआयडीसी पोलीस ठाण्याच लाच लुचपत प्रतिबंधक विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संतोष पंचरास हे सहाय्यक अभियंता म्हणून रांजणगांव विभागात नोकरीस आहेत. तर त्यांचा मदतनीस दिपक गव्हाण हे काम करत आहेत. दरम्यान, यातील तक्रारदार यांनी चालविण्यासाठी घेतलेले हॉटेलचे वीज मीटर बंद करण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी वीज जोडणीसाठी अर्ज केला होता. त्यावेळी लोकसेवक संतोष पंचरास व दिपक गव्हाणे यांनी त्यांना वीज कनेक्शन पुन्हा जोडून देण्यासाठी 25 हजार रुपयांची लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली होती. या तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर या दोघांवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे. त्या दोघांना आज न्यायालयात हजर केल्यानंतर दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान, यापुर्वीही दिपक गव्हाणे याला संतोष पंचरास यांच्या सांगण्यावरून 12 हजार रुपयांची लाच घेतना 2017 मध्ये पकडण्यात आले होते. सध्या ही केस न्यायालयात सुरू आहे. त्यात पुन्हा लाच मागतिल्याचे प्रकरण समोर आले आहे. त्यामुळे महावितरणमध्ये एकच खळबळ उडाली आहे. कोणत्याही लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत एसीबीकडे तक्रार करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/