पुणे जिल्ह्यातील तलाठी 50 हजारांची लाच घेताना ‘जाळ्यात’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – खरेदी केलेल्या जमिनीची नोंद ‘सात-बारा’ उताऱ्यावर घेतल्याचा मोबादला आणि नवीन खरेदी केलेल्या जमिनीची नोंद करण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून सूसगावच्या तलाठ्याला रंगेहाथ पकडले आहे.

सचिन तुकाराम जाधव (वय २९, सजा सूसगाव, ता. मुळशी) असे या तलाठ्याचे नाव असून त्याच्याविरुद्ध हिंजवडी पोलीस ठाण्यात FIR दाखल करण्यात आला आहे. तक्रारदराने 20 गुंठे जमीन खरेदी केली होती. ‘त्या’ जमिनीची नोंद ७/१२ उताऱ्यावर तलाठी जाधव यांनी घेतली होती. त्यानंतर त्याशिवाय नवीन जमीन तक्रारदार यांनी खरेदी केली होती. अगोदरच्या कामाचा मोबदला व नवीन जमिनीची नोंद 7/12 उताऱ्यावर करण्यासाठी तलाठी जाधव यांनी तक्रारदारांकडे 70 हजार रुपयांची मागणी केली होती.

तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. त्यांच्या तक्रारीची पडताळणी बुधवारी झाली. पडताळणीमध्ये तक्रारदारांच्या जमिनीची नोंद करण्यासाठी 70 हजार रुपयांची लाच मागत असल्याचे निष्पन्न झाले. तडजोडीअंती त्याने 50 हजार रुपये घेण्याचे मान्य केले. त्यानुसार पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे व अपर पोलीस अधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून 50 हजार रुपये स्वीकारताना सचिन जाधव याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like