Pune : 50 हजाराच्या लाच प्रकरणी जुन्नर तालुक्यातील तलाठ्यास आणि खासगी व्यक्तीला एसीबीकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – वाहनांवर कारवाई न करण्यासाठी 50 हजार रुपयांची लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल करत तलाठी व खासगी व्यक्तीला अटक केली. जुन्नर येथे ही कारवाई करण्यात आली आहे.

सुधाकर रंगराव वावरे (वय 45) व खासगी व्यक्ती रजाक इनामदार (वय 49, जुन्नर,ता.जुन्नर, जि.पुणे) अशी अटक केलेल्याची नावे आहेत. याप्रकरणी जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुधाकर वावरे हे तलाठी आहेत. जुन्नर सज्जा येथे ते काम करतात. दरम्यान, यातील तक्रारदार यांचे बिल्डींग मटेरियल सप्लायसाठी ने-आन करण्यासाठी वाहने आहेत.

या वाहनांवर कारवाई न करण्यासाठी म्हणून प्रत्येक महिन्याला लोकसेवक वावरे यांनी 50 हजार रुपयांची लाचेची मागणी केली. तसेच लाच मागणी करत असताना तक्रारदार व लोकसेवक यांच्यात रजाक याने मध्यस्ती करून लाच देण्यासाठी प्रोत्साहन दिले होते. याबाबत एसीबीकडे तक्रार करण्यात आली होती. यानंतर एसीबीने याची पडताळणी केली. त्यात लाच मागितली असल्याचे समोर आल्यानंतर गुन्हा दाखल करत या दोघांना अटक करण्यात आली आहे.