Pune ACB-Bribe Demand Case | बिल्डरकडे लाच मागितल्याप्रकरणी महावितरण कार्यालयातील योगेश पाटील यांच्याविरूध्द अ‍ॅन्टी करप्शनकडून गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune ACB-Bribe Demand Case | बांधकाम व्यवसायिकाकडून 24 हजार रूपयाची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सेनापती बापट रस्त्यावरील महावितरण कार्यालयातील (Mahavitaran SB Road Office) तंत्रज्ञ योगेश गोकुळ पाटील (Yogesh Gokul Patil) यांच्याविरूध्द चतुःश्रंगी पोलिस ठाण्यात (Chaturshringi Police Station) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Bribe Case)

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे बिल्डर असून त्यांनी करून दिलेल्या वास्तु नुतनीकरण इमारतीमध्ये वीज मीटर कमी पडत असल्याने त्याठिकाणी नवीन 4 वीज मीटर कनेक्शन घेणेकरता व नवीन वीज मीटर जोडणीसाठी महावितरण कार्यालयात अर्ज केला होता. योगेश पाटील यांनी तक्रारदार बिल्डर यांच्याकडे नवीन कनेक्शन आणि स्थळ पाहणी अहवालात त्रुटी न ठेवण्यासाठी प्रत्येक मीटर कनेक्शनमागे 6 हजार रूपये असे एकुण 4 मीटरसाठी 24 हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली.

लाच देण्याची इच्छा नसल्याने बिल्डरने अ‍ॅन्टी करप्शनकडे तक्रार दिली होती. प्राप्त तक्रारीची पडताळणी केली असता पंचासमक्ष योगेश पाटील यांनी 24 हजार रूपायाच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर योगेश पाटील यांच्याविरूध्द अ‍ॅन्टी करप्शनने गुन्हा दाखल केला आहे.

पुणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक विद्युलता चव्हाण करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nana Patole Criticised BJP | काँग्रेसची भाजपावर खोचक टीका, ”नेतृत्व नसल्याने आयारामांना राज्यसभा उमेदवारी, निष्ठावंतांना डावलले”

Pune Police Inspector Transfers | पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचा रूद्रावतार ! लोणीकंद आणि हडपसर पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची उचलबांगडी