Pune ACB – FIR On Tukaram Supe | टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणातील आरोपी व तत्कालीन शिक्षणाधिकारी तुकाराम सुपेवर पुणे अ‍ॅन्टी करप्शनकडून गुन्हा दाखल, जाणून घ्या प्रकरण

3 कोटी 59 लाख 99 हजार 590 रुपयांची मालमत्ता सुपे याने भ्रष्ट मार्गाने जमवल्याचे तपासात निष्पन्न झाले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune ACB – FIR On Tukaram Supe | टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणातील (TET Exam Scam Case) आरोपी व तत्कालीन शिक्षणाधिकारी तुकाराम नामदेव सुपे Tukaram Namdev Supe (वय-59 रा.कल्पतरू, गांगर्डेर नगर,सुदर्शन हॉस्पिटल समोर, पिंपळे गुरव, पुणे) यांच्याकडे मोठ्या प्रमाणात मालमत्ता मिळून आली आहे. त्यांनी ही मालमत्ता आपल्या सरकारी पदाचा गैरवापर करुन मिळवली असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Pune ACB) तुकाराम सुपे यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune ACB – FIR On Tukaram Supe)

याबाबत पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीराम विष्णू शिंदे (PI Shriram Vishnu Shinde) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात (Sangvi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार तुकाराम नामदेव सुपे याच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम (Corruption Prevention Act), सन 1988 चे कलम 13 (1)(ई), 13(2), भ्रष्टाचार प्रतिबंध सुधारित कायदा 2018 चे कलम 13(1)( ब) व 13 (2) प्रमाणे बुधवारी (दि.6) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune ACB – FIR On Tukaram Supe)

तत्कालीन शिक्षणाधिकारी तुकाराम सुपे याच्यावर सायबर पोलीस ठाण्यात (Cyber Police Station) आयपीसी 406, 409,
420, 467 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याच्या तपासात जप्त करण्यात आलेली 2 कोटी 87 लाख 99 हजार 590 रुपये
रोख रक्कम व 72 लाखांचे 145 तोळे सोने असे एकूण 3 कोटी 59 लाख 99 हजार 590 रुपयांची मालमत्ता सुपे याने
भ्रष्ट मार्गाने जमवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सुपे याने 1986 ते 25 डिसेंबर 2021 या कालावधीत
आपल्या सरकारी पदाचा गैरवापर करुन ही मालमत्ता मिळवली. तुकाराम सुपे यांनी सेवा कालावधीत वैध उत्पन्नापेक्षा जास्तीची अपसंपदा मिळवल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर एसीबीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे (SP Amol Tambe), अपर पोलीस अधीक्षक शीतल जानवे
(Addl SP Sheetal Janve) यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.
पुढील तपास पोलीस उपअधीक्षक माधुरी भोसले (DySP Madhuri Bhosale) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjay Raut | बिघडलेल्या आरोग्य सेवेला संजय राऊतांचा ‘लेटर डोस’, मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात खळबळजनक आरोप!

Pune Crime News | अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन मानसिक छळ, 30 वर्षाच्या नराधमावर गुन्हा दाखल; कोथरुड परिसरातील घटना

डर्टी पिक्चर ! पतीला कामावरुन काढून टाकण्याची धमकी देऊन महिलेवर बलात्कार, वाघोली परिसरातील घटना