Pune : 300 रूपयांची लाच मागितल्याप्रकरणी तहसील कार्यालयातील महिला ऑपरेटरवर अ‍ॅन्टी करप्शनकडून कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   तीनशे रुपयांची लाच मागीतल्या प्रकरणी घोडेगाव तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षकासह कंत्राटी संगणक ऑपरेटर महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुरवठा निरीक्षक अनिल भाऊराव पाटील आणि संगणक ऑपरेटर जयश्री शेंगाळे यांच्यावर घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिल पाटील हे घोडेगाव तालुका तहसील कार्यालयात पुरवठा विभागात पुरवठा निरीक्षक आहेत. तर शेंगाळे या संगणक ऑपरेटर आहेत. दरम्यान यातील तक्रारदार यांनी घोडेगाव तहसीलअंतर्गंत येणाऱ्या पुरवठा विभागात दुबार रेशनकार्डसाठी अर्ज केला होता. त्याची शासकीय फी ही 20 रुपये आहे. परंतु हे दुबार रेशनकार्ड देण्यासाठी पाटील व शेंगाळे यांनी तक्रारदार यांच्याकडे 300 रुपये लाचेची मागणी केली होती. याबाबत त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्या वेळी त्यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार दोघांच्या विरोधात घोडेगाव पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपअधीक्षक प्रतिभा शेंडगे करत आहेत.