Pune ACB Trap | आईच्या कामगार विम्याची रक्कम मिळवून देण्यासाठी 1 लाखाची मागणी, 10 हजार रुपये लाच स्वीकारताना महिलेसह दोनजण अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आईच्या कामगार विम्याची रक्कम मिळवून देण्यासाठी एक लाख रुपये लाचेची मागणी करुन दहा हजार रुपये लाच घेताना (Accepting Bribe) एका खासगी महिलेसह दोघांना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Pune ACB Trap) सापळा रचून रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी (दि.15) केली. योगिता अरुण शेंडगे Yogita Arun Shendge (वय-40 रा. लक्ष्मीनगर, थेरगाव), फारुख हनिफ पठाण Farooq Hanif Pathan (वय-56 रा. बोपोडी) असे लाच (Pune ACB Trap) घेताना पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

 

याबाबत 21 वर्षीय व्यक्तीने पुणे एसीबीकडे (Pune ACB Trap) तक्रार केली आहे. तक्रारदार यांच्या आईचा फेब्रुवारी 2022 मध्ये मृत्यू झाला आहे. तिची महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याण मंडळामध्ये बांधकाम मजूर म्हणून नोंदणी आहे. त्यामुळे तिचा कामगार विमा (Workers Insurance) म्हणून मिळणारी 2 लाख 34 हजार रुपयांची रक्कम कामगार कार्यालयाकडून मिळवून देण्यासाठी योगिता शेंडगे यांनी तक्रारदार यांच्याकडे एक लाख रुपये मागितले. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे एसीबीकडे तक्रार केली.

पुणे एसीबीच्या पथकाने मंगळवारी (दि.14) पडताळणी केली असता योगिता शेंडगे यांनी एक लाख रुपये मागितल्याचे निष्पन्न झाले.
त्यापैकी 10 हजार रुपये अॅडव्हान्स म्हणून मागणी केली.
योगिता शेंडगे यांना तक्रारदार यांच्याकडून दहा हजार रुपये लाच घेताना रंगेहात पकडले.
तर फारुख शेख याने लाच घेण्यास मदत केली. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivajinagar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रणेता सांगोलकर (Police Inspector Praneta Sangolkar) करीत आहेत.

 

ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे (SP Amol Tambe),
अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav)
यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune ACB Trap | 1 lakh demand to get mother’s labor insurance amount, two people including woman in anti-corruption net while accepting bribe of 10 thousand rupees

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Police News | गुन्ह्याच्या उत्कृष्ट तपासाबद्दल केंद्रीय गृहमंत्रालयाकडून राज्यातील 43 पोलीस अधिकाऱ्यांचा पदक देऊन सन्मान

Rajgad Fort | पुणे जिल्ह्यातील राजगड किल्ल्यावर रात्रीच्या मुक्कामाला बंदी, उल्लंघन केल्यास…

Pune Crime News | मोक्का गुन्ह्यात दीड वर्ष फरार असलेल्या शेवाळे टोळीच्या प्रमुखाला कोंढवा पोलिसांनी ठोकल्या बेड्या