Pune ACB Trap | ‘पोक्सो’ गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी मागितली 10 हजाराची लाच, पोलीस आणि खासगी व्यक्ती अॅन्टी कप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या पोक्सो गुन्ह्यात (POCSO Act) आरोपी न करण्यासाठी दहा हजार रुपये लाच घेताना (Accepting Bribe) चाकण पोलीस ठाण्यातील (Chakan Police Station) पोलीस शिपाई (Police Constable) आणि खासगी व्यक्तीला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Pune ACB Trap) सापळा रचून रंगेहात पकडले आहे. पोलीस शिपाई संतोष सुरेश पंदरकर (Santosh Suresh Pandarkar), खाजगी इसम किसन आंद्रे (Kisan Andre) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. पुणे एसीबीच्या पथकाने (Pune ACB Trap) ही कारवाई सोमवारी (दि.19) केली.

 

याबाबत 32 वर्षीय व्यक्तीने पुणे एसबीकडे (Pune ACB Trap) तक्रार केली आहे. चाकण पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी पोलीस शिपाई संतोष पंदरकर यांनी दहा हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी याबाबत पुणे एसीबीकडे 3 डिसेंबर रोजी तक्रार केली.

पथकाने पडताळणी केली असता, पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या पोस्को गुन्ह्यात आरोपी (Accused) न करण्यासाठी पोलीस शिपाई पंदरकर यांनी दहा हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. पथकाने सोमवारी सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून लाचेची दहा हजार रुपये रक्कम स्विकाराताना खासगी इसम किसन आंद्रे याला ताब्यात घेण्यात आले.
त्यानंतर पोलीस शिपाई संतोष पंदरकर याला ताब्यात घेतले.
दोघांवर चाकण पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (Prevention of Corruption Act) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे (Police Inspector Shri Ram Shinde) करीत आहेत.

 

ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे (SP Amol Tambe),
अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav)
यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune ACB Trap | A bribe of 10,000 was demanded not to accuse the accused in the ‘POCSO’ crime, police and private individuals in the net of anti-caption.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MPSC Students Protest in Pune | पुण्यात MPSCचे विद्यार्थी आक्रमक; आंदोलन करत केल्या ‘या’ मागण्या

Jayant Patil | ‘…हे ट्विट नक्की कोणी केले? पायउतार होण्यापूर्वी काय तो निकाल द्या’ – जयंत पाटील

Nora Fatehi | फिफा वर्ल्ड कपमधील नोरा फतेहीचा ‘तो’ डान्स व्हिडिओ वायरल