Pune ACB Trap | गुन्ह्यात मदत करण्यासाठी 5 हजाराची लाच घेताना कोथरूड एसीपी ऑफिसमधील पोलिस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune ACB Trap | पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी पाच हजार रुपयाची लाच घेताना (Accepting Bribe) पोलीस हवालदार विजय एकनाथ शिंदे (Vijay Eknath Shinde) यांना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Pune ACB Trap) रंगेहात पकडले. ही सापळा कारवाई शनिवारी (दि.13) करण्यात आली असून रविवारी (दि.14) कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (Prevention of Corruption Act) गुन्हा दाखल (FIR) करण्यात आला आहे. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या कारवाईमुळे पुणे पोलीस (Pune Police) दलात खळबळ उडाली आहे.

 

याप्रकरणी 26 वर्षीय व्यक्तीने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Pune ACB Trap) तक्रार केली. त्यानुसार शुक्रवारी (दि.12) पडताळणी करण्यात आली. तर रविवारी सापळा रचून पोलीस हवालदार विजय शिंदे (वय – 48) यांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले.

 

तक्रारदार व त्यांच्या मित्रावर कोथरुड पोलीस ठाण्यात चॅप्टर केस (Chapter Case) दाखल आहे. यामध्ये हजर करुन घेण्यासाठी व जामीन मिळण्यास मदत करण्यासाठी विजय शिंदे यांनी पाच हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे एसीबीकडे (Anti Corruption Bureau (ACB) Pune) तक्रार केली. पथकाने शुक्रवारी पंचासमक्ष पडताळणी केली असता शिंदे यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. शनिवारी सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताना शिंदे यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्यावर कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन विशेष न्यायालयात (Special Court) हजर केले असता न्यायालयाने 16 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पुढील तपास पुणे एसीबीचे (Pune ACB) पोलीस निरीक्षक प्रविण निंबाळकर (Police Inspector Pravin Nimbalkar) करत आहेत.

 

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (Pune ACB SP Rajesh Bansode),
अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav) यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे पथकाने केली.

 

Web Title : – Pune ACB Trap | ACB Trap On Policeman Vijay Eknath Shinde Of Kothrud ACP Office Pune

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा