Pune ACB Trap | 20 हजारांची लाच घेताना महिला अधिकाऱ्यासह एजंट अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी वीस हजार रुपये लाच घेताना मौजे शिवणे येथील महिला मंडल अधिकारी आणि एजंटला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Pune ACB Trap) सापळा रचून रंगेहात पकडले. पुणे एसबीच्या पथकाने (Pune ACB Trap) ही कारवाई मावळ तालुक्यातील आढले बुद्रुक तलाठी कार्यालयात मंगळवारी (दि.6) केली.

मंडल अधिकारी संगीता राजेंद्र शेरकर (वय 54) आणि एजेंट संभाजी लोहोर असे लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत 48 वर्षीय व्यक्तीने पुणे एसीबीकडे (Pune ACB Trap) शुक्रवारी (दि.2) तक्रार केली आहे.

तक्रारदार यांनी मावळ तालुक्यातील भडवली येथे जमीन खरेदी केली आहे. खरेदी केलेल्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर नावनोंदणी करण्यासाठी संगीता शेरकर यांनी वीस हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

पुणे एसीबी पथकाने पडताळणी केली असता, संगीता शेरकर यांनी सातबारा उताऱ्यावर नावनोंदणी करण्यासाठी वीस
हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. मंगळवारी आढले बुद्रुक तलाठी कार्यालयात सापळा रचण्यात आला.
तक्रारदार यांच्याकडून वीस हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना दोघांना रंगेहात पकडण्यात आले.
आरोपींवर वडगाव मावळ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पुणे एसीबीचे पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे करीत आहेत.

ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे,
अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.

Web Title :- Pune ACB Trap | Anti-corruption arrest agent with Lady officer in bribery of 20,000

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Karnataka Seemawad | बेळगावातील दगडफेकीचे पडसाद पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकामध्ये

Devendra Fadnavis | “ज्यांना कोकणाने भरभरून दिलं त्यांनीच अन्याय केला”; रिफायनरी होणारच, देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका