Pune ACB Trap | ग्रामविकास अधिकाऱ्याकडून 30 हजार रुपये लाच घेताना सहायक लेखा परीक्षा अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune ACB Trap | कामकाजात आढळून आलेल्या त्रुटी आणि वसुलीचा रिपोर्ट न पाठवण्यासाठी ग्रामविकास अधिकाऱ्याकडून (Rural Development Officer) 30 हजार रुपये लाच घेतना (Accepting Bribe) सहायक लेखा परीक्षा अधिकारी (Assistant Audit Officer) महेश एकनाथ म्हात्रे Mahesh Eknath Mhatre (वय-42) यांना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Pune ACB Trap) रंगेहात पकडले. ही कारवाई शुक्रवारी (दि.16) आळंदी येथील पी.सी.एस. चौकात करण्यात आली.

 

महेश म्हात्रे हे स्थानिक निधी लेखापरीक्ष पुणे (Local Fund Audit Pune) कार्यालयात सहायक लेखा परीक्षा अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तर तक्रारदार हे ग्रामविकास अधिकारी आहेत. तक्रारदार हे पूर्वी कार्यरत असलेल्या खेड तालुक्यातील नानेकरवाडी ग्रामपंचायतीचे (Nanekarwadi Gram Panchayat) लेखापरीक्षण महेश म्हात्रे यांनी केले आहे. तक्रारदार यांच्या नेमणुकीच्या कालावधीतील कामकाजामध्ये आढळून आलेल्या त्रुटी, अनियमिततेबाबत वसुलीचा रिपोर्ट (Recovery report) न पाठवण्यासाठी म्हात्रे यांनी 30 हजार रुपये लाच मागितली.

 

तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे एसीबीकडे (Pune ACB Trap) तक्रार केली.
पथकाने पंचासमक्ष 15 सप्टेंबर रोजी पडताळी केली.
त्यावेळी महेश म्हात्रे याने तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी करुन आळंदी येथील पी.सी.एस चौकात लाचेची रक्कम घेण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार पथकाने सापळा रचून म्हात्रे यांना लाचेची रक्कम घेताना रंगेहात पकडले.
म्हात्रे याच्यावर आळंदी पोलीस ठाण्यात (Alandi Police Station) भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत (Prevention of Corruption Act) गुन्हा दाखल करुन अटक (Arrest) केली.
आरोपीला खेड विशेष न्यायालयात (Village Special Court) हजर केले असता पोलीस कोठडी सुनावली.

 

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे (Pune ACB SP Rajesh Bansode),
अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav) यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे पथकाने केली.
पुढील तपास पुणे पथकाचे पोलीस निरीक्षक भारत साळुंखे (Police Inspector Bharat Salunkhe) करीत आहेत.

 

Web Title :- Pune ACB Trap | Assistant Audit Officer caught in anti-corruption net while taking Rs 30 thousand bribe from Village Development Officer

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Politics | पेंग्विन आणल्याने राज्याचा विकास होतो का?, अजित पवारांच्या प्रश्नाला बावनकुळेंचा रोखठोक सवाल

Beed ACB Trap | 1500 रुपये लाच घेताना सहायक सरकारी महिला वकील अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Maharashtra Politics | पत्राचाळ प्रकरणी अतुल भातखळकर यांचा गंभीर आरोप, म्हणाले – ‘शरद पवार हेच खरे रिंग मास्टर…’