Pune ACB Trap | रापमच्या भोर आगार व्यवस्थापकासह चालक 4 हजार रुपये लाच घेताना अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे/भोर : पोलीसनामा ऑनलाइन – खात्यांतर्गत कारवाई न करण्यासाठी आणि रजा मंजूर करण्यासाठी 4 हजार रुपये लाच घेताना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भोर आगार व्यवस्थापकासह चालकाला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Pune ACB Trap) सापळा रचून रंगेहात पकडले. पुणे एसीबीच्या पथकाने (Pune ACB Trap) ही कारवाई भोर येथील एसटी आगारातील कक्षाच्या बाहेर सोमवारी (दि. 5) केली.

 

भोर आगार व्यवस्थापक युवराज दिनकरराव कदम (वय 52), चालक विजय नामदेव राऊत (वय 51) असे लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत 49 वर्षीय व्यक्तीने पुणे एसीबीकडे (Pune ACB Trap) तक्रार केली आहे.

तक्रारदार यांच्यावर खात्यांतर्गत कारवाई न करण्यासाठी तसेच रजा मंजूर करण्यासाठी
आगार व्यवस्थापक युवराज कदम यांनी चार हजार रुपये लाचेची मागणी केली.
तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे एसीबीकडे तक्रार केली.
पुणे युनिटने पडताळणी केली असता, कदम यांनी चार हजार रुपये लाचेची मागणी करून लाचेची रक्कम चालक विजय राऊत याच्याकडे देण्यास सांगितले.
त्यानुसार पथकाने भोर एसटी आगारात सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून चार हजार रुपये लाच घेताना विजय राऊत यांना रंगेहात पकडले.
यानंतर आगार व्यवस्थापक युवराज कदम यांना ताब्यात घेण्यात आले.
दोघांवर भोर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे,
अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे
पोलीस निरीक्षक विरनाथ माने आणि त्यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune ACB Trap | Bhor Agar manager of Rapam along with driver caught in anti-corruption net while accepting bribe of Rs.4 thousand

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Chandrashekhar Bawankule | ‘मागासवर्गीय समाजाला स्वतःचे हित कळतं…’; चंद्रकांत बावनकुळेंची प्रतिक्रिया

ShivendraRaje Bhosale | उदयनराजे भोसलेंच्या आंदोलनामागे कोण?; काही राजकीय स्वार्थ… – शिवेंद्रराजे भोसले

Kirit Somaiya | शिवाजी महाराजांबद्दल बोलताना काळजी घेतलीच पाहिजे – किरीट सोमय्या