Pune ACB Trap Case | वाघोली येथील तलाठी कार्यालयात मदतनीस म्हणून काम करणार्‍या दोघांना अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक, 50 हजाराच्या लाचेची मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune ACB Trap Case | वाघोली येथील तलाठी कार्यालयात (Wagholi Talathi Office) मदतनीस म्हणून काम करणार्‍या दोघांना अ‍ॅन्टी करप्शन विभागाच्या (Anti Corruption Bureau Pune) पथकाने 50 हजार रूपयाची लाच मागितल्याप्रकरणी अटक केली आहे (Pune ACB Arrest Two In Bribe Case). याप्रकरणी दोघांविरूध्द लोणीकंद पोलिस स्टेशनमध्ये (Lonikand Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune ACB Trap Case)

 

भाऊसाहेब भिकाजी गिरी Bhausaheb Bhikaji Giri (56, रा. साई बालाजी सोसायटी, आव्हाळवाडी, वाघोली, जि. पुणे) आणि संजय मारूती लाड Sanjay Maruti Lad (53, रा. साईनगर, लोहगाव – Lohegaon, ता. हवेली, जि. पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. (Pune ACB Trap Case)

 

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावे खरेदी केलेल्या जागेची नोंद 7/12 उतार्‍यावर घेण्यासाठी त्यांनी वाघोली येथील तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. 7/12 उतार्‍यावर नोंद घेण्यासाठी तलाठी कार्यालयात मदतनीस म्ळणून काम करणारे संजय लगड व गिरी यांनी तलाठयांकडून काम करून देण्यासाठी 50 हजार रूपयाच्या लाचेची मागणी (Pune ACB Demand Case) तक्रारदाराकडे केली होती. (Pune Bribe Case)

Advt.

लाच देण्याची तक्रारदाराची इच्छा नसल्याने त्यांनी अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार दिली. प्राप्त तक्रारीची पडताळणी करण्यात आली.
त्यावेळी भाऊसाहेब गिरी यांनी तलाठी पटांगे यांच्यासाठी 45 हजार रूपये व त्यांच्या स्वतःसाठी 5 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केल्याचे
निष्पन्न झाले (Pune Crime News). त्या लाच मागणीस संजय लगड यांनी सहाय्य केले आहे. त्यामुळे दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात
आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक अमोल तांबे (Pune ACB SP Amol Tambe),
अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. शीतल जानवे (Addl SP Shital Janve)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधीक्षक माधुरी भोसले (DySP Madhuri Bhosale) अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :  Pune ACB Trap Case | Anti-corruption arrests two working as helpers in
Talathi office in Wagholi, demands a bribe of Rs 50,000

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा