Pune ACB Trap Case | 1.50 लाख रूपयाच्या लाच प्रकरणी ‘त्या’ पोलिस निरीक्षकास अंतरिम अटकपूर्व जामीन, पुढील सुनावणी 31 मे रोजी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune ACB Trap Case | गॅस एजन्सीवर कारवाई न करण्यासाठी दीड लाख रुपयांची लाच (Pune Bribe Case) स्वीकारल्याप्रकरणात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने Anti Corruption Bureau (ACB) Pune कारवाई केल्यानंतर पुणे ग्रामीण पोलिस दलातील (Pune Rural Police) लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे (Lonavala Gramin Police Station) पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे (Police Inspector Pravin More) हे फरार झाले होते. त्यांनी अटक (Pune Crime) टाळण्यासाठी न्यायालयात (Pune Court) धाव घेतली असून न्यायालयाने त्यांना अंतरिम अटकपूर्व जामीन (Interim Pre-Arrest Bail) मंजूर केला. त्यांच्या जामीन अर्जावर 31 मे रोजी सुनावणी होणार आहे. (Pune ACB Trap Case)

लोणावळा परिसरातील एका गॅस एजन्सीवर (Gas Agency Lonavala) गुन्हा दाखल न करण्यासाठी सहायक पोलीस उपनिरीक्षक कुतबुद्दीन खान याने २ लाखांची लाच मागितली होती. मध्यस्थामार्फत एजन्सीच्या मालकाने दीड लाख रुपयांची लाच देण्याचे मान्य केले. याबाबत गॅस एजन्सीच्या मालकाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Pune ACB Trap Case) तक्रार दिली होती. या तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यात सहायक पोलीस उपनिरीक्षक खान याने मध्यस्थी यासीन कासम शेख याला लाच घेण्यासाठी पाठविले. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पुणे-मुंबई रोडवरील (Mumbai-Pune Road) लोणावळा येथील करिष्मा ढाबा (Karishma Dhaba Lonavala) येथे तक्रारदाराकडून दीड लाख रुपयांची लाच घेताना शेख याला रंगेहाथ पकडले होते.

यासीन शेख याची चौकशी केल्यावर त्याला सहायक उपनिरीक्षक कुतबुद्दीन खान याने पाठविल्याचे उघड झाले. दोघांना ताब्यात घेऊन अटक केली. त्यांना लाच घेण्यास प्रोत्साहन दिल्यामुळे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे (PI Pravin More) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे समजल्यानंतर प्रवीण मोरे पसार झाले होते. त्यानंतर त्यांनी न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला. पुढील सुनावणी 31  मे रोजी सुनावणी होणार आहे.

Web Title : Pune ACB Trap Case | Lonavala Gramin Police Station Police Inspector Pravin More Got Interim Pre-Arrest Bail In Bribe Case Anti Corruption Bureau (ACB) Pune

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री? राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही; आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त