Pune ACB Trap Case | पुणे : रिंग रोडच्या भूसंपादनाचा मोबदला देण्यासाठी लाचेची मागणी, तहसीलदार यांच्यासाठी दीड लाख रुपये लाच मागणाऱ्या अव्वल कारकूनावर एसीबीकडून FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune ACB Trap Case | वाहतुकीचा ताण कमी करण्याच्यादृष्टीने प्रस्तावित चक्राकार रस्त्यांच्या (रिंग रोड – Pune Ring Road) भूसंपादन प्रक्रिया पार पाडण्यात आली आहे. रिंग रोडमध्ये भूसंपादन झालेल्या जमिनीचा सरकारी मोबदला देण्यासाठी दीड लाख रुपये लाच मागणाऱ्या हवेली तहसील कार्यालयातील (Haveli Tahsildar Office) अव्वल कारकुनावर पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.23) करण्यात आली. नरेंद्र भानुदास ढोले Narendra Bhanudas Dhole (वय-40) असे गुन्हा दाखल केलेल्या अव्वल कारकुनाचे नाव आहे. नरेंद्र ढोले याने तहसिलदार यांच्यासाठी लाचेची मागणी केली.(Pune ACB Trap Case)

याबाबत 47 वर्षीय व्यक्तीने पुणे एसीबीकडे तक्रार केली आहे. पुणे (पश्चिम) रिंगरोडसाठी आवश्यक जमिनीचे अंतिम दर निश्चित करण्यात आले असून भूसंपादन झालेल्या जमीनधारकांना मोबदला दिला जात आहे. तक्रारदार यांची जमीन पश्चिम चक्राकार रस्त्यासाठी (रिंग रोड) संपादित होत आहे. या जमिनीची नुकसान भरपाई मोबदला म्हणून तक्रारदार यांना 34 लाख 20 हजार 348 रुपये मिळणार होते. तक्रारदार यांच्या त्या जागेच्या 7/12 उताऱ्यावरील पोकळीस्त असलेली नोंद तहसिलदार कार्यालयाकडून कमी करायची होती. ती नोंद कमी करण्यासाठी तक्रारदार यांचे अर्ज प्रकरण हवेली तहसीलदार कार्यालय येथे प्राप्त झाले होते.

या अर्जाची पोकळीस्त नोंद कमी करण्यासाठी अव्वल कारकुन नरेंद्र ढोले याने तक्रारदार यांच्याकडे तहसीलदार यांच्यासाठी दीड लाख रुपये लाचेची मागणी केली.
याबाबत तक्रारदार यांनी पुणे एसीबी कार्यालयात तक्रार दिली.
एसीबीच्या अधिकाऱ्यांनी प्राप्त तक्रारीची 8, 9, 14, 15 , 20 फेब्रुवारी व 20 मार्च रोजी पडताळणी केली.
यावेळी अव्वल कारकुन नरेंद्र ढोले याने तहसीलदार यांच्यासाठी दीड लाख रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार ढोले याच्यावर खडक पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध काद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास पोलीस उपअधीक्षक माधुरी भोसले करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे एसीबी पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Amol Kolhe | असा पोरकटपणा दाखवाल, तर लक्षात ठेवा गद्दारीचा विजय कधीच होत नाही, पुरावे माझ्याकडेही, अमोल कोल्हेंचा विरोधकांना इशारा

Swargate Pune Police | व्होडाफोन कंपनीतून चोरलेला 54 लाखांचा मुद्देमाल परराज्यातून जप्त, स्वारगेट पोलिसांची कामगिरी

Pune Fraud Case | पुणे: आर्मी मध्ये भरती करण्याचे आमिष दाखवून तरुणांची फसवणूक, आरोपीला जामीन मंजूर

Hadapsar Pune Crime | पुणे : लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, लग्नास नकार दिल्याने तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न

ACB Trap Case | पाच हजार रुपये लाच घेताना पोलीस उपअधीक्षक अँटी करप्शनच्या जाळ्यात

Aaditya Thackeray In Maval Lok Sabha | आदित्य ठाकरे आज मावळमध्ये, संजोग वाघेरे भरणार उमेदवारी अर्ज, म्हणाले ”महागाईने त्रस्त जनता…”